ETV Bharat / sports

राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर मोठी कारवाई - slow over-rate

रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा 8 धावांनी पराभव केला होता

अजिंक्य रहाणे
author img

By

Published : Apr 1, 2019, 7:43 PM IST

चेन्नई - आयपीएलच्या बाराव्या मोसमात झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्धच्या सामन्यात षटकांची गती कायम न राखल्यानं राजस्थानरॉयल्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेवर कारवाई करण्यात आली आहे. सामना झाल्यानंतर आयपीएलकडून रहाणेवर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आयपीएलमध्ये रविवारी झालेल्या या सामन्यात चेन्नईने राजस्थानचा 8धावांनी पराभव केला होता. या सामन्यात चेन्नईने राजस्थानसमोर विजयासाठी 176धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला २० षटकात 167 धावा करत्या आल्या. आयपीएल या मोसमामध्ये राजस्थानला अद्याप विजयाचे खाते उघडता आले नाही.

या मोसमात यापूर्वी अशाच प्रकारची कारवाई मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मावरही करण्यात आली होती. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध झालेल्या सामन्यात रहाणेप्रमाणेच षटकांची गती कायम न राखल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.

Intro:Body:

SPO 3

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.