ETV Bharat / sports

कोरोनाच्या लढ्यासाठी मराठमोळ्या अजिंक्यचा हातभार, दिली मदत - अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाखांची मदत

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाखांची मदत दिली आहे.

ajinkya rahane donates rs 10 lakh to indias fight against covid-19
कोरोनाच्या लढ्यासाठी मराठमोळ्या अजिंक्यचा हातभार, दिली मदत
author img

By

Published : Mar 29, 2020, 3:06 PM IST

मुंबई - भारतामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक झपाट्याने वाढ होत आहे. सद्यस्थितीत भारतात कोरोनाचे ९७९ रुग्ण आहेत. केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धडपडत आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदत करा, असे आवाहन शनिवारी जनतेला केले. मोदींच्या या आवाहनानंतर बीसीसीआयने ५१ कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तर बॉलीवूड स्टार अक्षय कुमारने २५ करोड रुपये दिले. यात भारताचा मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणेने देखील मदत देत सामाजिक भान जपले आहे.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अजिंक्य रहाणेने महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाखांची मदत दिली आहे. रहाणेने सांगितले की, 'या कठीण काळात माझ्याकडून ही छोटी मदत आहे. यापुढेही मी शक्य तितकी मदत करत राहिन.'

  • This is just my tiny bit and a drop in the ocean. Will do my best to support in this difficult time. Meanwhile stay home stay safe

    — Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) March 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कोरोनविरुद्धच्या लढ्यासाठी अनेक दानशूर मंडळींनी पुढाकार घेतला आहे. यात खेळाडूंमध्ये भारताचा माजी मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने ५० लाख, सुरैश रैनाने ५२ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी देखील ५० लाख रुपयांचे तांदुळ मदत म्हणून देणार असल्याचे सांगितले आहे.

याशिवाय कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपला सहा महिन्याचा पगार हरियाणा सरकारला दिला आहे. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने १० लाख रुपयाचा निधी दिला आहे. याचसोबत मुंबई क्रिकेट असोसिएशने देखील ५० लाख आर्थिक सहायासोबत गरज पडल्यास आपल्या अखत्यारीत येणारी मैदाने वैद्यकीय सुविधेसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली आहे. दरम्यान, देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. याची संख्या १८६ इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.