ETV Bharat / sports

विराटसमोर हुजरेगिरी केली नाही म्हणून रायुडू टीम इंडियाबाहेर, जडेजाचा गंभीर आरोप

author img

By

Published : Sep 22, 2020, 5:17 PM IST

जी हुजूर करत कर्णधाराच्या मागे न फिरल्याने रायुडूला भारतीय संघातून बाहेर जावे लागले, असा गंभीर आरोप अजय जडेजाने केला आहे.

ajay jadeja says ambati rayudu did not do ji hujuri to virat kohli that is why he dropped from team india
विराटसमोर 'जी हुजूरी' केली नाही म्हणून रायुडू टीम इंडियाबाहेर, जडेजाचा गंभीर आरोप

नवी दिल्ली - मुंबईविरुद्ध निर्णायक खेळी करणाऱ्या अंबाटी रायुडूबद्दल भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने मोठे विधान केले आहे. जी हुजूर करत कर्णधाराच्या मागे न फिरल्याने रायुडूला भारतीय संघातून बाहेर जावे लागले, असा गंभीर आरोप अजय जडेजाने केला आहे.

एका क्रीडा संकेतस्थळाच्या कार्यक्रमात बोलताना अजय जडेजा म्हणाला, रायुडूची एकदिवसीय क्रिकेटमधील सरासरी ५०च्या आसपास होती. एवढी सरासरी मोठमोठ्या खेळाडूंची सुद्धा नाही. पण जेव्हा संघाचा कर्णधार बदलतो, तेव्हा हुजरेगिरी करत नाहीत असे खेळाडू संघाबाहेर होतात. मला वाटतं रायुडू त्याच खेळाडूंपैकी एक आहे.

दरम्यान, रायुडूला इंग्लंडमध्ये २०१९मध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. यावर अनेक दिग्गज खेळाडूंनी टीका करत आश्चर्य व्यक्त केले होते. त्याच्या जागेवर निवड समितीने, विजय शंकर आणि ऋषभ पंत यांना संधी दिली. मात्र या दोघांनाही विश्वकरंडक स्पर्धेत आपली छाप सोडता आली नाही. याचाच फटका भारतीय संघाला बसला आणि भारतीय संघ विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत बाद झाला.

आयपीएल २०२०च्या सलामीचा सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला. चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात रायुडूने मोलाचे योगादान दिले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने दिलेल्या १६२ धावांचे लक्ष्य पार करताना खराब सुरुवात होऊनही चेन्नईने विजयश्री खेचून आणला. ६ धावांवर २ बाद अशी स्थिती असताना फाफ डू प्लेसिस आणि रायुडू यांनी डाव सावरला.

फाफ डू प्लेसिसने ४४ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. तर रायडूनेही शानदार ७१ धावांची खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ६ चौकार लगावले. या दोघांनी केलेल्या शानदार अर्धशतकी खेळीमुळे पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईला मात दिली.

हेही वाचा - IPL २०२० : एका धडकेमुळे 'सनरायझर्स'च्या हातून सामना निसटला; पाहा व्हिडिओ

हेही वाचा - काय सांगता?, 'इतक्या' लोकांनी पाहिला यंदाच्या आयपीएलचा पहिला सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.