काबूल - कडक आरोग्य नियमांच्या अंतर्गत अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने रविवारपासून प्रशिक्षण सुरू केले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने या प्रशिक्षणादरम्यानचे खेळाडूंचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. कोरोना व्हायरसमुळे जगभरातील क्रीडाविषयक उपक्रम स्थगित होते. मात्र, आता हळूहळू बदल होताना दिसून येत आहे.
"आरोग्य नियमांचे पालन करून क्रिकेटपटूंनी काबुल क्रिकेट स्टेडियमवर प्रशिक्षण सुरू केले आहे", असे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने कॅप्शनमध्ये सांगितले. या प्रशिक्षणाची शनिवारी बोर्डाने माहिती दिली होती.
-
Pictures: National players resume training at Kabul Cricket Stadium under relevant health guidelines ! #AfghanAtalan pic.twitter.com/V1kFNH6vJs
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Pictures: National players resume training at Kabul Cricket Stadium under relevant health guidelines ! #AfghanAtalan pic.twitter.com/V1kFNH6vJs
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 7, 2020Pictures: National players resume training at Kabul Cricket Stadium under relevant health guidelines ! #AfghanAtalan pic.twitter.com/V1kFNH6vJs
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) June 7, 2020
काही दिवसांपूर्वी, ऑस्ट्रेलियाच्या अव्वल क्रिकेटपटूंनी सिडनी ऑलिम्पिक पार्कमध्ये सराव केला होता. या सरावात स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल स्टार्क यांच्यासह इतर खेळाडूंनीही सहभाग नोंदवला.
यावेळी संघाचा मुख्य फलंदाज स्टीव्ह स्मिथने आपली प्रतिक्रिया दिली. ''दोन महिने फलंदाजीपासून दूर राहून शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची काळजी घेतली आहे. यामुळे गेल्या काही वर्षांच्या तुलनेत मी तंदुरुस्तीच्या सर्वोत्तम स्तरावर आहे'', असे स्मिथने सांगितले होते.ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनतर श्रीलंकेचे क्रिकेटपटूही सरावात परतले होते.