कराची - पदार्पणाच्या कसोटी सामन्यात आणि त्याच्या पुढच्या सामन्यातही शतक ठोकल्यानंतर पाकिस्तानी फलंदाज आबिद अलीने एक खास विक्रम नोंदवला. पहिल्या दोन कसोटी सामन्यात सलग शतक ठोकणारा तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला पाकिस्तानी खेळाडू आणि नववा फलंदाज ठरला आहे.
-
Two centuries in three innings.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
FIRST PAKISTAN BATSMAN TO SCORE 100s IN HIS FIRST TWO TEST MATCHES!
Well done @AbidAli_Real 🔥🔥🔥#PAKvSL https://t.co/ZbY9reTRyg pic.twitter.com/UX6ncfflxQ
">Two centuries in three innings.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 21, 2019
FIRST PAKISTAN BATSMAN TO SCORE 100s IN HIS FIRST TWO TEST MATCHES!
Well done @AbidAli_Real 🔥🔥🔥#PAKvSL https://t.co/ZbY9reTRyg pic.twitter.com/UX6ncfflxQTwo centuries in three innings.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 21, 2019
FIRST PAKISTAN BATSMAN TO SCORE 100s IN HIS FIRST TWO TEST MATCHES!
Well done @AbidAli_Real 🔥🔥🔥#PAKvSL https://t.co/ZbY9reTRyg pic.twitter.com/UX6ncfflxQ
हेही वाचा - VIDEO : तिसऱ्या वनडेपूर्वी टीम इंडियाने मैदानात गाळला घाम
श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात आबिदने हा कारनामा केला. या सामन्यात आबिदने २१ चौकार आणि एका षटकारासह १७४ धावांची खेळी केली. आबिद आणि शान यांनी पहिल्या विकेटसाठी २७८ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानच्या सलामीवीरांनी केलेली ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली आहे. याआधी १९९७ मध्ये आमीर सोहेल आणि इजाझ अहमद यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना बरोबरीत सुटला. पदार्पणाच्या या सामन्यात आबिदने १०९ धावांची खेळी केली होती.
कारकिर्दीच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांत शतक झळकावणारे फलंदाज -
⦁ बिल पोनस्फोर्ड (१९२४)
⦁ डॉज वॉल्टर्स (१९६५)
⦁ अलव्हीन कालिचरण (१९७२),
⦁ मोहम्मद अझरुद्दीन (१९८४)
⦁ ग्रेग ब्लेवेट (१९९५)
⦁ सौरव गांगुली (१९९६)
⦁ रोहित शर्मा (२०१३)
⦁ जिमी निशम (२०१४)
⦁ आबिद अली (२०१९)