मुंबई - भारताचा माजी फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राने भारत-पाकिस्तान या दोन देशांचा मिळून एक सर्वोत्तम कसोटी संघ निवडला आहे. याचे नेतृत्व त्याने पाकिस्तानी खेळाडूंकडे सोपवले आहे. दोन्ही देशांमध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडू असल्याने सर्वोत्तम संघाची निवड करताना प्रचंड डोकेदुखी झाल्याचे त्याने सांगितले.
चोप्राने निवडलेल्या संघात भारतीय फलंदाजांचे वर्चस्व दिसत आहे, तर गोलंदाजीत पाकिस्तानी खेळाडूंचा दबदबा जाणवत आहे. चोप्राने त्यांच्या संघात सलामीवीर म्हणून पाकिस्तानचा सईद अनवर आणि भारताचे सुनील गावस्कर यांना पसंती दिली आहे. याशिवाय त्याने दुसरा सलामीवीर म्हणून वीरेंद्र सेहवागची निवड केली गेली आहे.
चोप्राच्या संघाची मधल्या फळीची जबाबदारी राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्या खांद्यावर आहे. पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर अनुक्रमे इंझमाम-उल-हक आणि जावेद मियाँदाद यांची निवड त्याने केली आहे. सातव्या क्रमांकासाठी यष्टिरक्षक-फलंदाज महेंद्रसिंग धोनीला त्याने पसंती दिली आहे.
गोलंदाजीची कमान कपिल देव, इमरान खान, वसिम अक्रम आणि अनिल कुंबळे यांच्यावर आहे. महत्त्वाचे म्हणजे, चोप्राने त्याच्या या संघाचे नेतृत्व इमरान खान यांच्या खांद्यावर सोपवले आहे. दरम्यान, चोप्राने पाकिस्तानी खेळाडूला कर्णधारपदी पसंती दिल्याने, त्याला नेटीझन्सनी ट्रोल केलं आहे.
हेही वाचा - ...म्हणून विराट कंपनीशी 'पंगा' घेण्यास खेळाडू घाबरतात
हेही वाचा - स्मिथ, वॉर्नर नसल्याने जिंकलात, पाक प्रशिक्षकांनी टीम इंडियाला डिवचले