चेन्नई - आयपीएल २०२१ चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात उद्या (ता.११) खेळला जाणार आहे. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. कोलकाताने या हंगामासाठी काही देशी-विदेशी खेळाडूंना आपल्या संघात घेतलं आहे. आज आम्ही तुम्हाला केकेआरचा संघ हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोणत्या चार विदेशी खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो, हे सांगणार आहोत. वाचा कोण आहेत ते खेळाडू...
शाकिब अल हसन -
बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला केकेआरने आपल्या संघात घेतले आहे. शाकिब सुनील नरेनच्या जागेवर संघात दिसू शकतो. तो गोलंदाजीसोबत फलंदाजीत देखील माहीर आहे. तसेच नरेनला मागील हंगामात आपली छाप सोडता आलेली नव्हती.
![4-foreign-players-who-can-play-for-kkr-in-first-match-of-ipl-2021](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11356434_kkr.jpg)
पॅट कमिन्स -
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर केकेआरने १५.५० करोडी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतलं आहे. तो एक दर्जेदार वेगवान गोलंदाज आहे. त्याने मागील हंगामात १४ सामन्यात १२ गडी बाद केले होते. यामुळे तो अंतिम संघात आपल्याला पाहायला मिळू शकतो.
![4-foreign-players-who-can-play-for-kkr-in-first-match-of-ipl-2021](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11356434_ffffffffff.jpg)
आंद्रे रसेल -
आंद्रे रसेल कोलकाता नाईट रायडर्सचा महत्वाचा खेळाडू आहे. तो मधल्या क्रमाकांवर येऊन स्फोटक फलंदाजी करत धावगती वाढवण्यात तरबेज आहे. त्यामुळे त्याचे अंतिम संघात खेळणे पक्के आहे.
![4-foreign-players-who-can-play-for-kkr-in-first-match-of-ipl-2021](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11356434_a.jpg)
इयॉन मॉर्गन -
इयॉन मॉर्गन संघाचा कर्णधार असल्याने त्याचे अंतिम संघात खेळणे निश्चित आहे. मॉर्गन कर्णधारासोबत मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज आहे. त्याने मागील हंगामात १४ सामन्यात ४१.८० च्या सरासरीने ४१८ धावा केल्या होत्या. लवकर विकेट गेल्या तर मॉर्गन डाव सावरू शकतो.
![4-foreign-players-who-can-play-for-kkr-in-first-match-of-ipl-2021](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11356434_mor.jpg)
हेही वाचा - IPL २०२१ : हार्दिक पांड्या अनफिट?, मुंबई इंडियन्सची चिंता वाढली
हेही वाचा - IPL २०२१ : दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी धोनी तयार; नेटमध्ये तुफान फटकेबाजी, पाहा व्हिडिओ