ETV Bharat / sports

World Cup २०१९ : भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबला', भारताला विजयी परंपरा राखण्याचे आव्हान - cricket

पाकिस्तानला आतापर्यंतच्या विश्वचषक इतिहासात एकदाही भारतावर विजय मिळवता आलेला नाही. यावेळीही पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत भारतापेक्षा खालच्या स्थानावर आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान 'महामुकाबला
author img

By

Published : Jun 16, 2019, 8:15 AM IST

लंडन - भारत विरुध्द पाकिस्तानचा 'महामुकाबला' आज रंगणार आहे. विश्वकरंडक स्पर्धेतील भारत विरुध्द पाकिस्तान या हायहोल्टेज सामन्याला सुरुवात होण्यास मोजकेच तास शिल्लक राहिले आहेत. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे.

दुपरी ३ वाजता या सामन्याला सुरूवात होईल. मात्र, इंग्लंडमधील गेल्या काही दिवसांपासूनचे हवामान पाहता या सामन्यावरही पावसाचे सावट असल्याचे चित्र आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना क्रिकेट चाहत्यांसाठी सर्वाधीक पसंतीचा सामना असतो. दोन्ही संघातील खेळाडूंवर प्रचंड दडपण असल्याने या खेळाची रंगत अजूनच वाढते.

पाकिस्तानला आतापर्यंतच्या विश्वचषक इतिहासात एकदाही भारतावर विजय मिळवता आलेला नाही. यावेळीही पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत भारतापेक्षा खालच्या स्थानावर आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यात अलिखित नियमानुसार भारताची फलंदाजी मजबूत आहे. तर पाकिस्तानी गोलंदाजीची धार तेज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा सामना भारतीय फलंदाज विरूद्ध पाकिस्तानी गोलंदाज असाच राहिल, असे चित्र आहे.

भारतीय संघ - विराट कोहली ( कर्णधार), रोहीत शर्मा, लोकेश राहुल, विजय शंकर, महेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक) केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह

पाकिस्तान संघ - इमाम उल-हक, फकर झमान, बाबर आझम, मोहम्मद हाफीझ, सर्फराज अहमद, शोएब मलिक, असिफ अली, हसन अली, वहाब रियाज, शादाब खान, मोहम्मद आमीर

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.