नवी दिल्ली - क्रिकेटच्या सामन्यादरम्यान ओडिशा येथील १८ वर्षीय तरूण क्रिकेटपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सत्यजीत प्रधान असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. केंद्रापाडाजवळील देराविश महाविद्यालयात सत्यजीत इयत्ता बारावीमध्ये शिकत होता.
हेही वाचा - लालरेमसियामीला मिळाला 'उदयोन्मुख महिला हॉकीपटू’ पुरस्कार
एक वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, महाविद्यालयीन मैदानावर स्थानिक सामन्यावेळी सत्यजीत बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.