मुंबई: आयपीएल स्पर्धेला शनिवारी सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात दिल्लीचा संघ ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सला सर्व बाजूंनी पाठिंबा मिळत असल्याचे दिसते. अशा परिस्थितीत भारताचा गोल्डन बॉय आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रानेही ( Gold medalist Neeraj Chopra ) दिल्ली संघ आणि त्यांचा कर्णधार ऋषभ पंतचे कौतुक केले आणि शुभेच्छी देखील दिल्या आहेत.
-
A 𝙨𝙪𝙣𝙚𝙝𝙧𝙖 message from @Neeraj_chopra1 to the DC Family 💙#YehHaiNayiDilli | #DCvMI#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/jzaOdfi8DS
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">A 𝙨𝙪𝙣𝙚𝙝𝙧𝙖 message from @Neeraj_chopra1 to the DC Family 💙#YehHaiNayiDilli | #DCvMI#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/jzaOdfi8DS
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 27, 2022A 𝙨𝙪𝙣𝙚𝙝𝙧𝙖 message from @Neeraj_chopra1 to the DC Family 💙#YehHaiNayiDilli | #DCvMI#TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/jzaOdfi8DS
— Delhi Capitals (@DelhiCapitals) March 27, 2022
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( MI vs DC ) संघातील सामन्याला रविवारी दुपारी साडेतीन वाजता सुरुवात होणार आहे. त्या अगोदर दिल्ली कॅपिटल्सने नीरज चोप्राचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये नीरज चोप्राने दिल्लीची नवीन जर्सी घातली आहे आणि त्यादरम्यान त्याने म्हटले आहे की, 'दिल्ली कॅपिटल्स आणि ऋषभ भाई, कठोर परिश्रम आणि चांगले खेळत आहेत. यावेळी नक्कीच आयपीएल ट्रॉफी घेऊन या. दिल्लीच्या संपूर्ण संघाला आणि त्यांच्या खेळाडूंना माझ्या शुभेच्छा. याशिवाय हा व्हिडिओ अपलोड करताना दिल्ली कॅपिटल्सने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'नीरज चोप्राकडून डीसी कुटुंबासाठी एक सुवर्ण संदेश.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals ) संघातील सामन्याची नाणेफेक दिल्ली संघाने जिंकली आहे. त्याचबरोबर त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतने आतापर्यंत मुंबईविरुद्ध 12 सामन्यात 30 पेक्षा जास्त सरासरीने 332 धावा केल्या आहेत. पंतने जवळपास 144 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. त्याने मुंबईविरुद्ध नाबाद 78 धावा या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येसह एकूण तीन अर्धशतके झळकावली आहेत. पंतने मुंबईविरुद्ध आतापर्यंत 29 चौकार आणि 17 षटकार मारले आहेत.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, अनमोलप्रीत सिंग, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, टायमल मिल्स, जसप्रीत बुमराह, बेसिल थम्पी.
दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): पृथ्वी शॉ, टीम सेफर्ट, मनदीप सिंग, ऋषभ पंत (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, ललित यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, खलील अहमद, कुलदीप यादव, कमलेश नागरकोटी.