ETV Bharat / sports

IPL 2023 : महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात केल्या सर्वाधिक धावा, केला नवा विक्रम - MS Dhoni

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात धोनीने 17 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा केल्या. मात्र, त्याला संघाला विजय मिळवुन देता आला नाही. त्याने आतापर्यंत स्पर्धेच्या शेवटच्या षटकात 693 धावा केल्याची नोंद त्याच्या नावावर झाली आहे.

IPL 2023
IPL 2023
author img

By

Published : Apr 13, 2023, 9:52 PM IST

हैदराबाद : चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शेवटच्या षटकात फलंदाजी करताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. या विक्रमात त्याच्या जवळपास दुसरा कोणीही फलंदाज पोहचलेला नाही. क्रिकेट विश्वात जेव्हा जेव्हा टॉप फिनिशर्सची चर्चा होते तेव्हा महेंद्रसिंग धोनीचे नाव यादीत पहिल्या क्रमांकावर येते. कर्णधार महेंद्र शिंग धोनी त्याच्या फिनिशिंग इनिंगसाठी ओळखला जातो. असेच काहीसे बुधवारी राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाले. महेंद्र शिंग धोनी त्याच्या फिनिशिंग इनिंगसाठी ओळखला जातो. या सामन्यात महेंद्र सिंग धोनीने 17 बाॅलमध्ये 1 चौकार, 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 32 धावा केल्या आहेत.

षटकात सर्वाधिक धावा : महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये शेवटच्या षटकात फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलमध्ये आतापर्यंतच्या शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा, सर्वाधिक चौकार, सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज म्हणुन धोनील मान मिळाला आहे. त्याने आतापर्यंत स्पर्धेच्या शेवटच्या षटकात 693 धावा केल्या आहेत. ज्या इतर कोणत्याही फलंदाजापेक्षा जास्त आहेत. याशिवाय त्याने शेवटच्या षटकात फलंदाजी करताना एकूण 49 चौकार, 57 षटकार मारले आहेत. चेन्नईसाठी खेळले 200 सामने : धोनीचा राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना हा त्याचा कर्णधार म्हणून 200 वा सामना होता. महेंद्र सिंग धोनीने आतापर्यंत आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून 214 सामने खेळले आहेत. तसेच धोनी हा आयपीएलमध्ये सर्वाधिक खेळणारा खेळाडू आहे. त्याने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 238 सामने खेळले आहेत.धोनीची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द : या स्पर्धेच्या पहिल्या सत्रात म्हणजेच 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आतापर्यंत एकूण 238 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 209 डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने 39.34 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. तसेच त्याने 135.78 स्ट्राईक रेटने एकूण 5 हजार 36 धावा केल्या आहेत.

हेही वाचा - Asad Encounter : एन्काउंटर करण्यासाठीदेखील आहेत नियम, जाणून घ्या, सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.