ETV Bharat / sports

Candice Warner : डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिसने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर व्यक्त केली नाराजी, जाणून घ्या काय आहे प्रकरण - बॉल टॅम्परिंग प्रकरण

ऑस्ट्रेलियन फलंदाज डेव्हिड वॉर्नरची पत्नी कँडिसने 2018 मध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणाच्या ( Ball tampering case ) पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलिया (सीए) वर आपल्या पतीवर झालेल्या अन्यायाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाच्या भूमिकेवरील बंदी लवकरात लवकर उठवण्यात ( Candice Warner demand to Cricket Australia ) यावी.

Candice Warner
कँडिस वार्नर
author img

By

Published : Jul 5, 2022, 4:30 PM IST

मेलबर्न : तीन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू, तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, त्यांचा उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर एका वादानंतर एक वर्षाहून अधिक कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास बंदी घालण्यात आली होती. तर स्मिथला दोन वर्षांसाठी नेतृत्वाची भूमिका घेण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच वॉर्नरवर त्याच्या उर्वरित व्यावसायिक कारकिर्दीसाठी कर्णधारपदावर बंदी घालण्यात आली होती. त्यावर आता कँडिस वार्नरने आपली नाराजी व्यक्त केली ( Candice Warner expresses displeasure ) आहे.

कँडिस वॉर्नरने सोमवारी चेतावणी दिली की तिचा नवरा कदाचित चांगल्यासाठी बिग बॅश लीग (बीबीएल) मधून माघार घेईल. वॉर्नर इंडियन प्रीमियर लीग 2022 हंगामासाठी तसेच देशासाठी उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ऑस्ट्रेलियाला आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेत त्याने काही चमकदार खेळी खेळल्या होत्या.

बीबीएलमधील सिडनी सिक्सर्सचे प्रशिक्षक ग्रेग शिपर्ड ( Sydney Sixers coach Greg Shippard ) यांनीही सीएला विनंती केली आहे की, वॉर्नरला किमान देशांतर्गत क्रिकेटमधील संघाचे नेतृत्व करण्याची परवानगी द्यावी. सँडपेपर प्रकरणानंतर त्यांने आपली बंदी तत्परतेने पूर्ण केली होती.

डेली मेलमधील एका वृत्तात कँडिसचा हवाला देऊन म्हटले आहे की, "मला अन्याय आवडत नाही त्यामुळे त्याचा मला त्रास होतो." कारण विश्वचषकादरम्यान तो संयुक्त अरब अमिराती संघाचे नेतृत्व करू शकला असता. तो भारतात (IPL) कर्णधार होऊ शकतो, जिथे लोक त्याच्या क्रिकेटचे कौतुक करतात. पण ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करू शकत नाही, असे का? कॅंडिसने सांगितले की, डेव्हिडकडे जगभरातील देशांतर्गत टी-20 स्पर्धांमध्ये कर्णधारपदाच्या अनेक आकर्षक ऑफर आहेत.

हेही वाचा - IND vs ENG 5th Test : पाचव्या दिवशी इंग्लंडला 119 धावांची गरज, भारताला विजयासाठी चमत्काराची अपेक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.