ETV Bharat / sports

New National Cricket Academy : 'नवीन एनसीए सुविधांवर काम सुरु होताच, बीसीसीआयला एकत्रितपणे पुढे जायचंय' - Karnataka State Cricket Association

बीसीसीआयला आशा आहे की नवीन एनसीए ( New National Cricket Academy ) देशातील खेळाडूंच्या रूपात वाढत्या क्रिकेटिंग इकोसिस्टमला समर्थन देईल. त्याचबरोबर प्रतिभावंताची काळजी देखील घेईल.

नवीन एनसीए
नवीन एनसीए
author img

By

Published : Feb 16, 2022, 6:12 PM IST

बंगळुरु : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड ( Board of Control for Cricket in India ) आशा करत आहे की, नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी ( New National Cricket Academy ) देशातील खेळाडू आणि प्रतिभांच्या रूपाने वाढत्या क्रिकेट इकोसिस्टमला पाठिंबा देईल. बेंगळुरूमध्ये नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची पायाभरणी करताना शाह म्हणाले की, केवळ सामूहिक दृष्टिकोनानेच भारतीय क्रिकेट नवीन उंची गाठेल.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्विट ( BCCI Secretary Jai Shah tweet ) केले की, बीसीसीआयच्या नव्या एनसीएची पायाभरणी ( BCCI lays foundation for new NCA ) करण्यात आली. उत्कृष्टतेचे केंद्र बनणे ही आमची सामूहिक दृष्टी आहे जी प्रतिभांचे पालनपोषण करते आणि भारतातील क्रिकेट इकोसिस्टमला समर्थन देते. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली ( BCCI President Sourav Ganguly ) यांनीही प्रस्तावित सुविधेची फोटो पोस्ट केले, जे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठे क्रिकेट पोषण केंद्र बनेल. बीसीसीआयने गेल्या वर्षी टर्नकी डिझाइन बिल्ड कंस्ट्रक्शन सेवांसाठी निविदा प्रक्रियेद्वारे निविदा काढल्या होत्या.

नवीन एनसीएच्या ब्लूप्रिंट नुसार उपलब्ध होणाऱ्या सुविधा :

नवीन सुविधेमध्ये प्रस्तावित केलेल्या बाबींमध्ये 16,000 स्क्वेअर फूट व्यायामशाळा, 40 सराव खेळपट्ट्या, ज्यात 20 फ्लडलाइट सुविधा, विविध आकाराच्या 243 खोल्या आणि एक ओपन एअर थिएटर यांचा समावेश आहे. एनसीएच्या ब्लूप्रिंट नुसार ( According to the NCA blueprint ) या आणि इतर अनेक जागतिक दर्जाच्या सुविधा जसे की फुटसल, स्क्वॅश, बॅडमिंटन, बास्केटबॉल, टेनिस, सायकलिंग ट्रॅक आणि तापमान नियंत्रित पूलसह इनडोअर प्रशिक्षण सुविधांचा देखील समावेश आहे. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील देवनहल्ली तालुक्यात 40 एकर जागेवर फार्मसी, कुरिअर-डिस्पॅच सुविधा, बँक, एटीएम, सलून आणि दुकाने यासारख्या पूरक तरतुदी देखील तयार केल्या जातील. बीसीसीआय नवीन एनसीए कॅम्पसमध्ये विकसनशील क्रिकेटपटूंसाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन राबवण्यासाठी इच्छुक आहे.

बीसीसीआयने कर्नाटक इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट बोर्ड ( Karnataka Industrial Area Development Board ) कडून सुमारे 50 कोटी रुपयांना 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर जमीन संपादित केली आहे. कर्नाटक राज्य सरकारांद्वारे जमिनीचा प्रश्न सोडवला जाऊ शकला नाही आणि शेवटी 2017 मध्ये बीसीसीआयच्या नावावर नोंदणी करण्यात आली.

2000 मध्ये एनसीएची बंगळूरूमध्ये स्थापना :

सन 2000 मध्ये एनसीएची स्थापना झाल्यापासून, ते बंगळुरूच्या मध्यभागी असलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या ( M Chinnaswamy Stadium ) परिसरातून सुरू आहे. स्टेडियमची मालकी असलेल्या कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने ( Karnataka State Cricket Association ) मैदानी सरावासाठी बीसीसीआयला मैदान बी भाड्याने दिले आहे. तसेच इनडोअर व्यायाम सुविधा आणि आधुनिक व्यायामशाळेसाठी स्वतंत्र जागा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.