मुंबई - टोकियो ऑलिम्पिकला २३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. भारतीय अॅथलेटिकपटू या स्पर्धेसाठी जपानमध्ये पोहोचले आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भारतीय क्रिकेटर्संनी या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंला शुभेच्छा दिल्या आहे. तसेच त्यांनी खेळाडूंना पाठिंबा देण्याचे आवाहन देखील देशवासियांना केले आहे.
बीसीसीआयने आज शनिवारी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत भारतीय महिला आणि पुरुष क्रिकेट संघातील खेळाडू टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओत कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, मिताली राज, हरमनप्रीत कौर, हरलीन देवोल, जेमिमाह रोड्रिग्ज हे खेळाडू शुभेच्छा देताना दिसत आहेत.
-
The BCCI proudly joins the Honourable Prime Minister of India Shri @narendramodi in extending our wholehearted support to the Team India Athletes @Tokyo2020
— BCCI (@BCCI) July 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
They have trained hard and are raring to go.
Let us get together and #Cheer4India | @JayShah | @IndiaSports pic.twitter.com/KDDr5wA28S
">The BCCI proudly joins the Honourable Prime Minister of India Shri @narendramodi in extending our wholehearted support to the Team India Athletes @Tokyo2020
— BCCI (@BCCI) July 10, 2021
They have trained hard and are raring to go.
Let us get together and #Cheer4India | @JayShah | @IndiaSports pic.twitter.com/KDDr5wA28SThe BCCI proudly joins the Honourable Prime Minister of India Shri @narendramodi in extending our wholehearted support to the Team India Athletes @Tokyo2020
— BCCI (@BCCI) July 10, 2021
They have trained hard and are raring to go.
Let us get together and #Cheer4India | @JayShah | @IndiaSports pic.twitter.com/KDDr5wA28S
टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी बीसीसीआय अभिमानाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साथ देत आहे. खेळाडूंनी खूप मेहनत घेतली आहे आणि ते स्पर्धेसाठी उत्सुक आहेत. आपण एकत्र येऊन भारताला प्रोत्साहन देऊ, अशा आशयाचे कॅप्शन बीसीआयने या व्हिडिओला दिले आहे.
टोकियो ऑलिम्पिकच्या उद्धाटन सोहळ्यात बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांना भारतीय पथकाचे ध्वजधारकाचा मान देण्यात आला आहे. तर समारोप सोहळ्यासाठी कुस्तीपटू बजरंग पुनिया ध्वजधारक असणार आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत १२६ भारतीय खेळाडू सहभागी होणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय क्रीडा मंत्रालयाने टोकियो ऑलिम्पिकसाठी खास एक थीम सॉन्ग तयार केले आहे. या गाण्याचे बोल देखील बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओत ऐकायला मिळत आहे. तसेच टोकियो ऑलिम्पिकसाठी 'चियर फॉर इंडिया' ही खास मोहिम आखण्यात आली आहे. दरम्यान, बीसीसीआयने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हेही वाचा - Ind vs SL : भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल, 'या' दिवसापासून मालिकेला सुरूवात, पण...
हेही वाचा - टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजाची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती