ETV Bharat / sports

IPL retention list 2022 : बंगळुरूने कोहली आणि चेन्नईने धोनीसह 'या' खेळाडूंना केले रिटेन

आगामी आयपीएल सत्रासाठी खेळाडूंच्या लिलावाअगोदरच काही संघांनी आपल्या खेळडूंना संघात राखले आहे. आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळवारी आपला पूर्व कर्णधार विराट कोहलीला रिटेन ( संघात राखून ठेवणे ) केले आहे. तसेच, मुंबई इंडियन्सने देखील भारताचा टी २० सामन्यांचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला रिटेन केले आहे.

ipl retaintion 2022
आयपीएल रिटेन्श धोनी
author img

By

Published : Dec 1, 2021, 6:20 AM IST

Updated : Dec 1, 2021, 6:59 AM IST

नवी दिल्ली - आगामी आयपीएल सत्रासाठी खेळाडूंच्या लिलावाअगोदरच काही संघांनी आपल्या खेळडूंना संघात राखले आहे. आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळवारी आपला पूर्व कर्णधार विराट कोहलीला रिटेन ( संघात राखून ठेवणे ) केले आहे. तसेच, मुंबई इंडियन्सने देखील भारताचा टी २० सामन्यांचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला रिटेन केले आहे.

हेही वाचा - Gautam Gambhir : गौतम गंभीरला ठार मारण्याची आईएसआईएसकडून धमकी

भारताचा माजी कर्णधार आणि धुवाधार फलंदाजीसाठी ओळख असलेल्या महेंद्र सिंह धोनी आणि ऑलराउंडर रविंद्र जडेजा आपल्या आधीच्या संघात म्हणजेच, चेन्नई सूपर किंग्समध्ये कायम राहणार आहेत. धोनी हे आपल्या संघात जडेजा नंतर रिटेन होणारे दुसरे खेळाडू आहेत. संघाने ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीला देखील रिटेन केले आहे. हे खेळाडू आपल्या मूळ संघात कायम राहणार असल्याने पुढील आयपीएल सत्रामध्ये या संघांच्या फॅन्सना पुन्हा आपले आवडते खेळाडू आपल्या आवडत्या संघात पहायला मिळणार आहेत.

आगमी आयपीएल सत्रासाठी मेगा लिलावाअगोदर आठ जुन्या संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सोपवायची होती. या पार्श्वभूमीवर काही संघांनी आपले खेळाडू रिटेन केले आहे. तसेच, पुढील आयपीएल सत्रात दोन नवे संघ लखनऊ आणि अहमदाबादचा समावेश होणार आहे.

रिटेन्शनचे नियम काय आहेत?

नियमांनुसार जुने आठ संघ कमीत कमी चार खेळाडू रिटेन करू शकतात. हे आठ संघ जास्तीत जास्त तीन भारतीय खेळाडू रिटेन करू शकतात. यामध्ये कॅप्ड आणि अनकॅप्ड अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंचा समावेश आहे. मात्र, कोणत्याही संघाला दोनपेक्षा अधिक अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करता येणार नाही. यासोबतच हे आठ संघ जास्तीत जास्त दोन विदेशी खेळाडूंना रिटेन करू शकतात.

मेगा लिलावाअगोदर दोन नवे संघ लखनऊ आणि अहमदाबाद एक ते २५ डिसेंबरदरम्यान प्रत्येकी तीन खेळाडूंना आपल्याबोरबर जोडू शकतात. त्यामध्ये अधिकाधिक दोन भारतीय खेळाडू असू शकतात.

संघ आणि त्यांनी रिटेन केलेले खेळाडू

हेही वाचा - IPL 2022 : आयपीएलचा 15 वा सीझन भारतात; दोन नवे संघ होणार सामील, BCCI ची घोषणा

Last Updated : Dec 1, 2021, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.