नवी दिल्ली : भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल ( Axar Patel Ready to Second Test ) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे फिट आहे. दुसरा कसोटी सामना 12 मार्च पासून बंगळुरु येथे खेळला जाणार आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार दुखापती बरोबरच कोरोना मधून सावरणाऱ्या अक्षर पटेलने फिरकीपटू कुलदीप यादवची ( Spinner Kuldeep Yadav ) जागा घेतली आहे, ज्याला संघातून बाहेर करण्यात आले आहे.
या अगोदर, पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर करताना बीसीसीआयने एक निवेदनात उल्लेख केला ( Mentioned in BCCI statement ) होती की, अक्षर पटेलचा फिटनेस पाहून त्याची दुसऱ्या कसोटीसाठी निवड केली जाईल. बीसीसीआयने पुढे सांगितले की, जर भारताने तीन फिरकी गोलंदाजांचे आक्रमण सुरूच ठेवले, तर जयंतच्या जागी अक्षर थेट इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. त्याच्या पहिल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये त्याने 11.86 च्या सरासरीने 36 विकेट घेतल्या आहेत.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, तथ्य हे आहे की, बंगळुरु कसोटी सामना एक डे-नाइट कसोटी सामना ( Day-night Test match ) आहे. ज्यामध्ये गुलाबी चेंडूचा वापर केला जाणार. निवडीसाठी अक्षर पटेल प्रबळ दावेदार ( Axar Patel is a strong contender ) असेल. कारण मागील वर्षी अहमदाबाद येथे झालेल्या शेवटच्या डे-नाईट कसोटीत त्याने इंग्लंड विरुद्ध 11 विकेट्स मिळवल्या आहेत.
कुलदीप यादवने मोहाली मध्ये पहिल्या कसोटी सामन्यात भाग घेतला नव्हता घेतला. भारताने जयंत यादवला तिसऱ्या फिरकीपटूच्या ( Jayant Yadav is the third spinner ) रुपाने खेळवले होते. परंतु जयंत यादव दोन डावात विकेट घेण्यात अपयशी ठरला होता. तर त्याचे फिरकी साथीदार आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून 15 विकेट्स घेत सामन्यावर वर्चस्व गाजवले होते.