सिडनी - आयपीएल २०२१ मध्ये सहभागी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आज मायदेशी पोहोचले आहे. मालदीवहून ते सिडनीमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना पुढील दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहावं लागणार आहे.
कोरोनामुळे आयपीएलचा चौदावा हंगाम मध्यातून स्थगित करण्यात आला. त्यानंतर खेळाडू आपापल्या देशाला परतले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने भारतातून येणाऱ्या प्रवाशी विमानांवर १५ दिवसाची बंदी घेतली होती. यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीव मार्गे ऑस्ट्रेलियात पोहोचले आहे.
भारतात खेळाडू प्रथम मालदीवला पोहोचले. तिथे काही दिवस क्वारंटाइन राहिल्यानंतर त्यांना तिथून ऑस्ट्रेलियात येण्याची परवानगी मिळाली. आज ते मालदीवहून सिडनीमध्ये दाखल झाले आहेत. पुढील दोन आठवडे त्यांना क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे.
माईक हसी आज पोहोचण्याची शक्यता
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसीला आयपीएलमध्ये कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तो ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. त्याने कोरोनावर मात केली. त्यानंतर तो मालदीवमध्ये दाखल झाला. आज सायंकाळी तो कतार मार्गे सिडनीमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - 'नॅशनल क्रश' रश्मिकाला आवडतो 'हा' क्रिकेटपटू
हेही वाचा - कोरोनाग्रस्त आई-वडिलांच्या उपचारासाठी क्रिकेटरकडे नव्हते पैसे; ज्वालाने केली मदत