ETV Bharat / sports

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा - वेस्ट इंडीज वि. ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका

ऑस्ट्रेलियाचा संघ लवकरच वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे.

australia-squad-for-west-indies-tour-announced
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा, जाणून घ्या कोणाला मिळाली संधी
author img

By

Published : May 17, 2021, 5:16 PM IST

मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा संघ लवकरच वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. अॅरोन फिंचकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाने आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने संघ निवडला आहे. यात त्यांनी स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मार्कस स्टायनिस, अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्वेपसन या सारख्या खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे. दुसरीकडे मार्नस लाबुसेन आणि कॅमेरुन ग्रीन यांना संघात स्थान मिळालेले नाही.

ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज दौऱ्यात ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल ५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्याला ९ जुलैपासून सुरूवात होणार आहे.

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ -

अॅरोन फिंच (कर्णधार), अॅश्टन अॅगर, जेसन बेहरनडॉर्फ, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, मोयसिस हेनरिक्स, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिले मेरेडिथ, जोश फिलिप, झाय रिचर्डसन, केन रिचर्डसन, तनवीर सांघा, डार्सी शॉर्ट, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मिचेल स्वेपसन, अँड्रु टाय, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झम्पा.

हेही वाचा - न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधीच इंग्लंडला जबर धक्का, 'या' खेळाडूला दुखापत

हेही वाचा - Italian Open: अटीतटीची झुंजाझुंज, नदालने वर्ल्ड नंबर १ जोकोव्हिचचा केला पराभव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.