केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या महिला टी 20 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 19 धावांनी पराभव करत क्रिकेटमधील सर्वात मोठे विजेतेपद पटकावले आहे. यासह, ऑस्ट्रेलियाच्या पुरुष आणि महिला संघाने एकूण 21 विजेतेपदे जिंकली आहेत. ऑस्ट्रेलियन महिला संघाने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याची हॅट्रिक साधली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 2018 आणि 2020 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. तसेच आता 2023 चा महिला टी 20 विश्वचषक जिंकून ऑस्ट्रेलियाने विजयाची हॅट्रिक केली आहे.
-
You cannot escape the celebrations, Shelley Nitschke! 😆#T20WorldCup | #AUSvSA | #TurnItUp pic.twitter.com/uKnzVZMNHy
— ICC (@ICC) February 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">You cannot escape the celebrations, Shelley Nitschke! 😆#T20WorldCup | #AUSvSA | #TurnItUp pic.twitter.com/uKnzVZMNHy
— ICC (@ICC) February 26, 2023You cannot escape the celebrations, Shelley Nitschke! 😆#T20WorldCup | #AUSvSA | #TurnItUp pic.twitter.com/uKnzVZMNHy
— ICC (@ICC) February 26, 2023
एकूण 21 विजेतेपद पटकावली : यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 2010, 2012 आणि 2014 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने 1987, 1982, 1988, 1997, 2005, 2013 आणि 2022 मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे. त्याच वेळी, पुरुष ऑस्ट्रेलियन संघाने 1987, 1999, 2003, 2007, 2015 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या विजेतेपदांवर आपले नाव नोंदवले आहे. दुसरीकडे टी 20 विश्वचषक 2021 आणि चॅम्पियन ट्रॉफी 2006 आणि 2009 देखील ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहेत. एकूणच, ऑस्ट्रेलियाने 1987 ते 2023 पर्यंत एकूण 21 विजेतेपद पटकावली आहेत.
-
Skipper Meg Lanning with one of her closest friends 😉#AUSvSA #T20WorldCup #TurnItUp pic.twitter.com/jK3dijUHOg
— ICC (@ICC) February 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Skipper Meg Lanning with one of her closest friends 😉#AUSvSA #T20WorldCup #TurnItUp pic.twitter.com/jK3dijUHOg
— ICC (@ICC) February 26, 2023Skipper Meg Lanning with one of her closest friends 😉#AUSvSA #T20WorldCup #TurnItUp pic.twitter.com/jK3dijUHOg
— ICC (@ICC) February 26, 2023
19 धावांनी सामना जिंकला : दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 156 धावा केल्या. या सामन्यात बेथ मुनीने नाबाद 74 धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून शबनीम इस्माईलने 4 षटकात 26 धावा देत 2 बळी घेतले. 157 धावा करण्यासाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत 6 विकेट गमावून केवळ 137 धावाच करता आल्या. या सह ऑस्ट्रेलियाने हा सामना 19 धावांनी जिंकला. बेथ मुनी हिला सामनावीर तर अॅश्ले गार्डनरला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. गार्डनरने संपूर्ण स्पर्धेत 110 धावा केल्या त्याचबरोबर 10 बळी देखील घेतले.
शबनीम इस्माईलचा विक्रम : या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. शबनीम इस्माईलने सामन्यात 2 बळी घेतले. यासह ती या स्पर्धेतील सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे. शबनिम इस्माईलच्या नावावर महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेत 32 सामन्यात 43 बळी आहेत. तिने 27 सामन्यांत 41 बळी घेतलेल्या इंग्लंडच्या अन्या श्रबसोलला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी 42 सामन्यांत 40 विकेट्स या घेऊन यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या सह शबनीम विश्वचषकात कोणत्याही एका विरोधी संघाविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली आहे. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 विकेट घेत हा विक्रम केला आहे.