ETV Bharat / sports

Andrew Symonds Dies : ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू

ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध असे माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्स यांचा रस्ते अपघातात मृत्यू ( Andrew Symonds dies in car accident ) झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली. सायमंड्स यांच्या मृत्यूनंतर क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे.

Andrew Symonds
अँड्र्यू सायमंड्स
author img

By

Published : May 15, 2022, 6:55 AM IST

क्वीन्सलँड ( ऑस्ट्रेलिया ) : ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमधील अॅलिस रिव्हर ब्रिजजवळ हर्वे रेंज रोडवर 46 वर्षीय महान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा कार अपघातात मृत्यू ( Andrew Symonds dies in car accident ) झाला. त्याची कार रस्ता सोडून उलटल्याने अपघात होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचे क्वीन्सलँड पोलिसांनी शनिवारी रात्री दिलेल्या निवेदनात म्हटले ( Queensland police statement ) आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हा आणखी एक मोठा धक्का आहे. मार्चमध्ये शेन वॉर्न आणि रॉड मार्श यांच्या दुःखद मृत्यूनंतर सायमंड्स हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील तिसरे दिग्गज आहेत ज्यांचे या वर्षी अचानक निधन झाले. सायमंड्सच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करणारे ट्विट करून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू जेसन नील गिलेस्पी यांनी सायमंड्सच्या मृत्यूच्या वृत्तावर शोक व्यक्त केला. "जागे होताच ही भयानक बातमी आली," असे ट्विट त्यांनी केले. "संपूर्णपणे उद्ध्वस्त. आम्ही सर्वजण तुझी आठवण काढणार आहोत मित्रा", असे ते ( shock over Symonds death ) म्हणाले.

माजी सहकारी आणि फॉक्स क्रिकेट सहकारी अॅडम गिलख्रिस्टने लिहिले, "हे खरोखर दुःखद आहे." वरिष्ठ क्रिकेट पत्रकार रॉबर्ट क्रॅडॉक यांनी दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री टाऊन्सविलेच्या बाहेर सुमारे ५० किमी अंतरावर ऑसी अष्टपैलू खेळाडूचा मृत्यू झाला. क्वीन्सलँड पोलिसांच्या निवेदनानुसार, सायमंड्स रात्री 10:30 वाजता कारने एकटे निघाले होते. त्यावेळी त्यांचा अपघात ( Aussie cricketer Symonds dies ) झाला.

अपघाताच्या माहितीनंतर, वैद्यकीय पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत सायमंड मृत्युमुखी पडले होते. सायमंड्स ऑस्ट्रेलियासाठी 26 कसोटी खेळले आणि 1999 ते 2007 दरम्यान जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा ते अविभाज्य भाग होते. निवृत्तीनंतर खेळताना, वॉर्न आणि सायमंड्स दोघेही फॉक्स क्रिकेटच्या समालोचन संघाचे महत्त्वपूर्ण सदस्य होते. (ANI)

हेही वाचा : Andrew Symonds Statement : आयपीएलमध्ये सर्वाधिक पैसे मिळाले म्हणून मायकल क्लार्क जळत होता - अँड्र्यू सायमंड्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.