क्वालालंपूर - यंदा न्यूझीलंडमध्ये होणारी वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धा कोरोनामुळे रद्द झाली आहे. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) गुरुवारी ही घोषणा केली. कोरोनामुळे असलेले निर्बंध आणि अनिश्चिततेच्या निरंतरतेमुळे बीडब्ल्यूएफ, बॅडमिंटन न्यूझीलंड आणि आयोजकांकडे ही स्पर्धा रद्द करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असे बीडब्ल्यूएफने सांगितले.
बीडब्ल्यूएफचे सरचिटणीस थॉमस लुंड यांनी सांगितले, की बीडब्ल्यूएफ वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप स्पर्धा रद्द झाल्याने आम्ही नक्कीच निराश आहोत. म्हणून सध्याच्या वेळापत्रकानुसार जानेवारी २०२१मध्ये न्यूझीलंडमध्ये या स्पर्धेचे आयोजन केले जाईल.
बॅडमिंटन न्यूझीलंड अजूनही वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यास वचनबद्ध आहे. बीडब्ल्यूएफने २०२४च्या हंगामासाठी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला आहे. ही बातमी निराशादायक असली, तरी सद्य परिस्थितीमुळे हा योग्य निर्णय असल्याचे बॅडमिंटन न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी जो हिचॉक म्हणाले आहेत.