बँकॉक - भारताची जगज्जेत्या महिला बॅडमिंटपटू पी. व्ही. सिंधूचे थायलंड ओपन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. तसेच समीर वर्माचा देखील संघर्षपूर्ण सामन्यात पराभव झाला.
सिंधूला रॅटचानोक इन्थॅनोनने पराभवाची चव चाखायला लावली. रॅटचानोकने हा सामना २१-१३, २१-९ अशा फरकाने जिंकला. विशेष म्हणजे, मागील तीन सामन्यात सिंधूने रॅटचानोकचा पराभव केला होता. तिने थायलंड ओपन स्पर्धेत सिंधूचा पराभव करत त्याची परतफेड केली.
पुरुष एकेरीत समीरने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावरील डेन्मार्कच्या अँडर्स अॅन्टोनसेनला झुंजवले. परंतु अखेरीस मॅच पाँइट वाया घालवल्याने अँडर्सने हा सामना २१-१३, १९-२१, २२-२० असा जिंकला.
दरम्यान, सिंधू आणि सायनाच्या पराभवामुळे भारताचे एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. सिंधूच्या आधी अनुभवी सायनाला स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता.
हेही वाचा - लॉकडाऊनमध्ये ज्वालाला येतेय बॉयफ्रेंडची आठवण, शेअर केले रोमँटिक फोटो
हेही वाचा - 'टाइम' मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली भारताची मानसी जोशी