बँकॉक - कोरोनामुळे जवळपास १० महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांना सुरुवात होत आहे. भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या आजपासून (मंगळवार) सुरू होणाऱ्या थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून वापसी करणार आहेत. त्यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा आहेत.
थायलंड ओपन स्पर्धेतून जपान आणि चीनने माघार घेतली आहे. यामुळे भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे. थायलंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने चीनने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर दुसरीकडे जगातील अव्वल मानांकित खेळाडू केंटो मोमोटा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. जपानने यामुळे अखेरच्या क्षणी या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
थायलंड ओपन स्पर्धेत भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूचा सलामीचा सामना डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी होणार आहे. तर सायनाची लढत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिच्याशी होईल. पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतला पहिल्या फेरीत भारताच्याच सौरभ वर्माशी दोन हात करावे लागतील. प्रणीतचा सामना थायलंडच्या कान्ताफोन वँगचारोएन याच्याशी होणार आहे. तसेच प्रणॉयची गाठ मलेशियाच्या आठव्या मानांकित ली झी जिया याच्याशी होणार आहे.
हेही वाचा - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाचा 'या' अभिनेत्याशी साखरपूडा, फोटो व्हायरल
हेही वाचा - व्हीलचेयरवर बॅडमिंटन खेळाडूने रचला इतिहास; शशांकने जिंकली 10 पदके