बँकाक - भारतीय सात्विकराज रणकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने रविवारी ऐतिहासिक कामगिरी करत थायलंड ओपनची स्पर्धा जिंकली. या जोडीने अंतिम फेरीत जागतिक क्रमवारीत दोन नंबरच्या नामांकन प्राप्त चीनच्या जोडीचा पराभव केला. महत्त्वाचे म्हणजे, पहिल्यादांच भारतीय जोडीने बीडब्ल्यूएफ सुपर ५०० टूर्नामेटची स्पर्धा जिंकली आहे.
थायलंड ओपनच्या अंतिम सामन्यात भारतीय जोडीने चीनच्या ली जुन हुई आणि ल्यू यु चेन या जोडीचा २१-१९, १८-२१, २१-१८ असा पराभव केला. हा अंतिम सामना एक तास दोन मिनिटे रंगला होता. दरम्यान, चीनच्या जोडीसोबत भारतीय जोडीने यापूर्वी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एक सामना खेळला असून त्या सामन्यात भारतीय जोडीचा पराभव झाला होता.
अंतिम सामन्यात भारतीय जोडीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच दर्जेदार खेळ केला. पहिल्या गेममध्ये मोजक्या चूका करत ९-६ अशी लीड घेतली. त्यानंतर चीनी जोडीने आक्रमक खेळ करत सामन्यात पलटवार करण्याचा प्रयत्न केला मात्र, भारतीय जोडी ब्रेकपर्यंत ११-९ अशा आघाडीवर राहिली. यानंतर भारतीय जोडीला संयम राखता आला नाही. त्यामुळे चीनी जोडीने स्कोर १५-१५ असा बरोबरीत आणला. दोन्ही देशाच्या खेळाडूंनी चांगला खेळ करत १४-१४ असी बरोबरी साधली. मात्र, मोक्याच्या क्षणी भारतीय जोडीने आक्रमक खेळ करत पहिला गेम २१-१९ ने जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने आपला धडाका कायम ठेवत ५-२ ने लीड घेतली. त्यानंतरही भारतीय जोडी ११-९ ने पुढे होती. तेव्हा चीनच्या जोडीने सामन्यात परतन्याच्या दृष्टीने खेळ करत १४-१४ असी बरोबरी साधली. त्यानंतर चीनच्या जोडीने दुसरा गेम २१-१८ ने जिंकत सामन्यात रंगत कायम ठेवली.
तिसऱ्या सेटमध्येही चीनच्या जोडीने सुरुवातीला दर्जदार खेळ करत ५-२ ने आघाडी घेतली. त्यानंतर भारतीय जोडीने आक्रमक फटके मारत सामना १४-१४ ने बरोबरीत आणला आणि तिसरा गेम २१-१८ ने जिंकत इतिहास घडवला.