सिंगापूर - पुरुष एकेरीत समीर वर्मापाठोपाठ भारताचा दुसरा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयनेही सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत १ तास ३ मिनीटे चाललेल्या सामन्यात प्रणॉयने फ्रान्सच्या ब्राईस लेवरडेजवर 11-21, 21-16, 21-18 असा विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले आहे.
-
Singapore Open: Sameer Verma, HS Prannoy Enter Round 2 With Contrasting Wins pic.twitter.com/f7mzodOWoB
— Anum (@anumworld) April 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Singapore Open: Sameer Verma, HS Prannoy Enter Round 2 With Contrasting Wins pic.twitter.com/f7mzodOWoB
— Anum (@anumworld) April 10, 2019Singapore Open: Sameer Verma, HS Prannoy Enter Round 2 With Contrasting Wins pic.twitter.com/f7mzodOWoB
— Anum (@anumworld) April 10, 2019
स्पर्धेच्या दूसऱ्या फेरीत प्रणॉयचा सामना हा दिग्गज खेळाडू आणि बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जापानच्या केंटो मोमोटाशी होणार आहे. मोमोटाने पहिल्या फेरीत भारताच्या बी-साई प्रणीतला 19-21, 21-14, 22-20 ने पराभुत करत दुसरी फेरी गाठली आहे.
सिंगापूर ओपनमध्ये समीर आणि प्रणॉय यांच्यापूर्वी आज भारताच्या सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनीही दुसऱ्या फेरीत आपली जागा पक्की केली आहे.