क्वालालंपुर - भारताची फुलराणी आणि आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे मलेशिया मास्टर्स स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले आहे. स्पेनची दिग्गज बॅडमिंटनपटू कॅरोलिन मरिनने २१-८, २१-७ अशा मोठ्या फरकाने सायनाचा पराभव केला.
हेही वाचा - खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राची सुवर्ण कामगिरी
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक विजेती सायनाच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. अवघ्या ३० मिनिटांत मरिनने सायनाला मात दिली. आत्तापर्यंत १३ वेळा या दोघी आमनेसामने आल्या होत्या. त्यामध्ये सात वेळा मरिनने विजय नोंदवला आहे.
तत्पूर्वी, विश्वविजेती पी.व्ही. सिंधुलाही उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. तिला महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चिनी तैपेईच्या ताई जु यिंगने २१-१६, २१-१६ असे पराभूत केले. यिंग विरुद्ध सिंधूचा हा १२ वा पराभव आहे. सिंधूने यिंगविरूद्ध पाच वेळा विजय मिळवला आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने यिंगचा पराभव केला होता