चीन - भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू सध्या सुरू असलेल्या चीन बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडली आहे. स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत ४२ व्या स्थानी असलेल्या चीनी तैपेईच्या पाय यू पोने सिंधूला २१-१३, १८-२१, २१-१९ अशा फरकाने मात दिली.
हेही वाचा - #HBD Virat: वाढदिवशी विराटने लिहिले स्वतःलाच प्रेरणादायी पत्र, वाचून तुमच्यातही संचारेल ऊर्जा
तीन गेमपर्यंत रंगलेल्या या अटीतटीच्या सामन्यात सिंधूला हरवण्यासाठी पाय यू पोनेने ७४ मिनिटे घेतली. कोरिया आणि डेन्मार्कमध्ये झालेल्या स्पर्धेतही चांगली कामगिरी करण्यात सिंधूला अपयश आले होते. यावर्षी झालेल्या स्वित्झर्लंडच्या बासेल येथे वर्ल्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवल्यानंतर सिंधूला आपला खेळ उंचावता आलेला नाही.
दुसरीकडे, भारताच्या प्रणॉयलाही या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. डेन्मार्कच्या रासमुस गेमकेने वर्ल्ड चॅम्पियनशिपममध्ये कांस्य पदक पटकावलेल्या प्रणॉयला २१-१७, २१-१८ अशी सरळ सेटमध्ये मात दिली.
![pv sindhu loses in first round of china badminton open](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/eiltdufueael1e6_0511newsroom_1572940954_558.jpg)