ETV Bharat / sports

थायलंड ओपन : पारुपल्ली कश्यपने अर्धवट सोडला सामना

author img

By

Published : Jan 13, 2021, 4:16 PM IST

जेसनने पहिल्या सेटमध्ये कश्यपला २१-९ असे हरवले. तर, दुसऱ्या सेटमध्ये कश्यपने २१-१३ असे पुनरागमन केले. तिसऱ्या सेटमध्ये स्नायू ताणले गेल्यामुळे कश्यपला माघार घ्यावी लागली. दुसरीकडे, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने कोरियाच्या किम जि जुंग आणि ली योंग डाएला १९-२१, २१-१६, २१-१४ अशी मात देत दुसरी फेरी गाठली.

indian shuttler kashyap went from the middle of the first round of thailand open
थायलंड ओपन : पारुपल्ली कश्यपने अर्धवट सोडला सामना

बँकॉक - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप थायलंड ओपन सुपर १००० स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडला आहे. तंदुरुस्तीच्या कारणामुळे कश्यपने पहिला सामना अर्ध्यातच सोडला. कॅनडाच्या जेसन अथनीसोबत तो तिसऱ्या सेटमध्ये ८-१५ असा मागे होता.

हेही वाचा - IND VS AUS : विल पुकोवस्कीला दुखापत; प्रशिक्षक लँगरने दिले 'हे' संकेत

जेसनने पहिल्या सेटमध्ये कश्यपला २१-९ असे हरवले. तर, दुसऱ्या सेटमध्ये कश्यपने २१-१३ असे पुनरागमन केले. तिसऱ्या सेटमध्ये स्नायू ताणले गेल्यामुळे कश्यपला माघार घ्यावी लागली. दुसरीकडे, पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीने कोरियाच्या किम जि जुंग आणि ली योंग डाएला १९-२१, २१-१६, २१-१४ अशी मात देत दुसरी फेरी गाठली.

indian shuttler kashyap went from the middle of the first round of thailand open
सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी

तर, मलेशियाच्या ओंग यू सिन आणि टिओयो यी यांनी अर्जुन एम रामचंद्रन आणि ध्रुव कपिला यांचा १३-२१, २१-८, २४-२२ असा पराभव केला. मिश्र दुहेरीत एन सिक्की रेड्डी आणि सुमित रेड्डी बी यांनाही पहिल्या फेरीत गाशा गुंडाळावा लागला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.