हैदराबाद - भारताची माजी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाने, गोपीचंद यांच्या अकादमीमध्ये आयोजित दुहेरीचे शिबीर स्थलांतिरित करण्याची मागणी केली होती. तिने हे शिबीर ज्वाला गुट्टा अकादमीमध्ये घेण्यात यावे, असे म्हटलं होतं. अधिक चांगले निकाल हवे, असल्यास हे शिबीर गुट्टा अकादमीमध्ये घेण्यात यावेत, अशी मागणी ज्वालाने केली होती. याविषयी 'ईटीव्ही भारत'ने भारताचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याशी बातचित केली. यादरम्यान, त्यांनी ज्यालाला उत्तर दिलं आहे.
गोपीचंद हे तमिळनाडू बॅडमिंटन सुपर लीगचे उद्धाटन करण्यासाठी आले होते. तेव्हा ईटीव्ही भारतने त्यांच्याशी बातचित केली. ते म्हणाले की, 'याविषयावर बोलण्यासारखं काही नाही. तुम्ही मागील १० वर्षाचा रेकॉर्ड तपासू शकता.'
दरम्यान, ज्वालाने दुहेरी जोडी बनवण्याच्या योगदानावर गोपीचंद यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर दुसरीकडे तिने एकेरीत चांगले खेळाडू घडवल्याचे सांगत गोपीचंद यांची स्तुतीही केली.
सिंधुने गोपीचंद अकादमी सोडली
ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधु आता गोपीचंद अकादमीत सराव करणार नाही. सिंधु हैदराबादच्या गचिबोवली स्टेडियमवर सराव करणार आहे. सिंधुच्या वडिलांनी याबाबत माहिती दिली. माजी आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू आणि सिंधुचे वडील पी. व्ही. रमणा यांनी स्पष्टीकरण दिले की, त्यांच्या मुलीने मानसिक कारणास्तव प्रशिक्षण ठिकाण बदलले आहे. गचिबोवली स्टेडियम जागतिक दर्जाच्या ठिकाणी खेळण्याचा अनुभव देते. पण सिंधु गोपीचंद यांच्यापासून विभक्त झालेली नाही. तिला ऑलिम्पिकच्या वातावरणात प्रशिक्षण घ्यायचे आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) आणि बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) यांना या बदलाची माहिती आहे.'
हेही वाचा - भारताच्या माजी बॅडमिंटनपटूला ब्रेन ट्यूमर
हेही वाचा - सिंधुने 'या' कारणामुळे सोडली गोपीचंद बॅडमिंटन अकादमी