ओडेन्से (डेन्मार्क) : - जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकवणारी भारतीय पी. व्ही. सिंधूचे डेन्मार्क ओपन स्पर्धेतील आव्हान संपूष्टात आले आहे. दुसऱ्या फेरीत दक्षिण कोरियाच्या १७ वर्षीय अॅन से यंगने सिंधूचा २१-१४, २१-१७ असा फरकाने पराभव केला. दरम्यान, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्यानंतर सिंधू तब्बल तीन स्पर्धांची उपांत्य फेरीही गाठू शकलेली नाही.
४० मिनिटे रंगलेल्या सामन्यात कोरियाची खेळाडू सिंधूवर भारी पडली. जागतिक क्रमवारीत ६ व्या स्थानावर असलेल्या सिंधूला १९ व्या मानांकित खेळाडूने पराभव करत स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणले. महत्वाचे म्हणजे, सिंधू आणि अॅन से यंग यांच्यात ही पहिलीच लढत होती.
दरम्यान, सिंधूच्या पराभवानंतर भारताचे महिला गटातील आव्हान संपुष्टात आले आहे. भारताची दुसरी महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा या स्पर्धेतील पहिल्या फेरीत पराभव झाला आहे. जागतिक स्पर्धेनंतर सिंधू चीन ओपन, कोरिया ओपन आणि आता डेन्मार्क ओपन स्पर्धेतून बाहेर पडली आहे.
हेही वाचा - सायनाने शेअर केला आपल्या बायोपिकचा 'फर्स्ट लुक', परिणीतीला दिल्या शुभेच्छा!
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी