ETV Bharat / sports

थायलंड ओपन : कॅरोलिना मरिन आणि व्हिक्टर एक्सेलसेन विजेते - थायलंड ओपन न्यूज

महिलांच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिनने ताई जु-यिंगला पराभूत केले. तर, पुरुषांमध्ये डॅनिश बॅडमिंटनपटू व्हिक्टर एक्सेलसेनने जेतेपद जिंकले.

Carolina Marin and Viktor Axelsen won Thailand Open title
थायलंड ओपन : कॅरोलिना मरिन आणि व्हिक्टर एक्सेलसेन विजेते
author img

By

Published : Jan 17, 2021, 7:14 PM IST

बँकॉक - स्टार बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरिनने थायलंड ओपन स्पर्धेचे जेतेपद जिंकले आहे. आज रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात तिने अव्वल महिला बॅडमिंटनपटू ताई जु-यिंगला पराभूत केले. ४२ मिनिटे रंगलेल्या सामन्यात मरिनने ताई जु-यिंगला २१-९, २१-१६ असे सरळ सेटमध्ये हरवले.

"मला सुरुवातीपासूनच दाखवायचे होते की, मला जिंकण्याची इच्छा आहे", असे २७ वर्षीय मरिन सामन्यानंतर म्हणाली. तर, ताई जु-यिंगने कबूल केले की, ती या सामन्यात फारशी वेगवान नव्हती. ऑलिम्पिक सुवर्ण जिंकणारी मरिन ही पहिली आशिया खंडाबाहेरील बॅडमिंटनपटू आहे.

हेही वाचा - शार्दुल ठाकुरच्या कामगिरीनंतर विराटचे मराठी ट्विट व्हायरल!

दुसरीकडे, पुरुषांमध्ये डॅनिश बॅडमिंटनपटू व्हिक्टर एक्सेलसेनने जेतेपद जिंकले. त्याने ४४ मिनिटांच्या सामन्यात एंगुल लाँगला २१-१४, २१-१४ असे हरवले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.