ETV Bharat / sitara

अबब!! प्रियंका चोप्रा जोनासने अ‍ॅमेझॉनबरोबर 'मल्टी मिलियन डॉलर'चा केला करार - प्रियंका चोप्रा जोनास

प्रियंका चोप्रा जोनास हिच्या हातामध्ये अनेक रोमांचक चित्रपट प्रोजेक्ट्स आहेत. याची तिने पूर्वी घोषणाही केलीय. यासोबत तिने अमेझॉनबरोबर 'मल्टी मिलियन डॉलर' करारही केला आहे. याची माहिती तिने आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

Priyanka Chopra
प्रियंका चोप्रा
author img

By

Published : Jul 1, 2020, 4:25 PM IST

लॉस एंजेलिस : अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनासने अमेझॉनबरोबर दोन वर्षांसाठीचा टीव्हीसाठी धडाकेबाज करार केला आहे. प्रियंकाने तिच्या ‘मल्टी मिलियन डॉलर’ कराराची माहिती दिलीय.

"शेवटी ही बातमी आपल्यासमवेत शेअर केल्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि उत्साही. पुढे पाहता आमच्याकडे आमच्या स्लेटवर आधीपासूनच बरेच काही आहे! @jsalke आणि त्यांच्या अमेझॉन टीमचे आभार," असे लिहित तिच्या प्रतिभेची कदर केल्याबद्दल प्रियंकाने आनंद व्यक्त केलाय.

प्रियंकाने २०१५ मध्ये स्वत: चे प्रोडक्शन बॅनर पर्पल पेबल पिक्चर्स लॉन्च केले होते. उत्तम आशय आणि जगभरातून "सर्जनशील प्रतिभा" तयार करण्याचे लक्ष्य तिने मनाशी बाळगले आहे. प्रियंका पुढे लिहिते, "हा माझ्या प्रोडक्शन हाऊस पर्पल पेबल पिक्चर्सचा नेहमीच डीएनए राहिला आहे आणि अमेझॉनसह या नवीन प्रयत्नांचा पाया आहे. ??

"आणि एक कथाकार म्हणून माझा मनोरंक गोष्टीं आणि कल्पनांसाठीचा शोध सुरू असतो, परंतु सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुक्त विचार व दृष्टीकोन आहे," असे प्रियंका म्हणाली.

आतापर्यंतच्या आपल्या प्रवासाचा मोठा भाग असल्याबद्दल, तिने तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा - आषाढी वारीनिमित्त संकर्षण कऱ्हाडे विचारतोय 'पंढरीच्या विठुराया कसं काय रे बरं हाय का..?'

एबीसी मालिका क्वांटिकोने हॉलिवूड कारकीर्दीची सुरुवात करणार्‍या प्रियांकाने बेवॉच आणि इज नॉट इट रोमँटिक सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

अ‍ॅमेझॉनबरोबर काम करत असतानाच प्रियंका यापुढे ‘नेटफ्लिक्ससाठी दोन प्रोजेक्ट्समध्ये काम करणार आहे. सध्या ती केनू रीव्स-स्टारर 'मॅट्रिक्स 4' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. कोरोना व्हायरसनंतर शूटिंग थांबवण्यात आले होते. आता नुकतेच शूटिंग सुरू झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.