ETV Bharat / sitara

इंटरनेटवर आंधळेपणाने विश्‍वास ठेवल्यामुळे होणाऱ्या परिणामांवर बोट ठेवणारं ‘वागले की दुनिया’ चे पुढील भाग! - sony sab tv

दैनंदिन जीवनगाथांशी संबंधित रोमांचक ट्विस्‍ट्ससह मनोरंजनासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ही मालिका समाज प्रबोधनाचे कामही करत असते.

wagle ki duniya
वागले की दुनिया
author img

By

Published : Jun 11, 2021, 12:43 PM IST

मुंबई - जेव्हापासून प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन्स आलेत तेव्हापासून अनेकजण सर्वज्ञ झाल्यासारखे वागताहेत. इंटरनेट वर बरीच माहिती उपलबध असल्यामुळे त्यावर विसंबण्याची सवय अनेकांना लागलीय. इंटरनेट सांगते ते सर्व खरेच असते असे मानणारेही अनेक महाभाग सापडतील. समाजाच्या याच समस्येवर सोनी सबवरील मालिका 'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से' प्रकाशझोत टाकून लोकांचे डोळे उघडणार आहे.

दैनंदिन जीवनगाथांशी संबंधित रोमांचक ट्विस्‍ट्ससह मनोरंजनासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी ही मालिका समाज प्रबोधनाचे कामही करत असते. आगामी एपिसोड्समध्‍ये तज्ञाचे मत न घेता इंटरनेटवर वाचलेल्‍या प्रत्‍येक गोष्‍टीवर अंधविश्‍वास ठेवल्‍यामुळे गोष्टी कुठल्या ठरला जाऊ शकतात हे दर्शविण्यात आले आहे. वंदनाची होणारी चूक यात पाहायला मिळणार आहे. एके दिवशी वंदनाचे डोकं दुखू लागते. डोकेदुखीपासून आराम मिळण्‍यासाठी ती इंटरनेटवर याबाबतच्या उपायांचा शोध घेते. वेबवर सर्चिंग करत असताना तिला समजते की, डोकेदुखीसाठी ब्रेन ट्यूमर कारणीभूत असू शकतो. तिला या उलगड्यामुळे धक्‍का बसतो व ती घाबरून जाते आणि तिला वाटू लागते की लवकरच तिचा मृत्‍यू होणार आहे. घाबरून गेलेली वंदना तिचा मृत्‍यू होण्‍यापूर्वी तिच्‍या मुलांना तिचे सिक्रेट्स सांगण्‍याचे ठरवते. अगदी दु:खी मनाने ती तिच्‍या मुलांसाठी पत्र लिहित त्‍यामध्‍ये तिच्‍या भावना व जीवनाविषयक धडे व्‍यक्‍त करते.

वंदना वागळेची भूमिका साकारणारी परिवा प्रणती म्हणाली की, ''आजच्‍या काळात आपल्‍या मनात शंका येते तेव्‍हा आपण शंकेच्‍या निरसनसाठी इंटरनेटचा आधार घेतो. आपल्‍याला मिळालेल्‍या निष्‍पत्ती कधी-कधी योग्‍य असतात, तर कधी-कधी काहीशा संदिग्‍ध असतात. मिळणारे उत्तर अयोग्‍य असू शकते हे माहित असताना देखील आपण वेब विश्‍वाचा वापर करणे कधीच थांबवत नाही. आगामी एपिसोडमध्‍ये मी साकारत असलेली भूमिका वंदना इंटरनेटवर इतका विश्‍वास ठेवताना पाहायला मिळणार आहे की, तिचा मृत्‍यू होणार आहे हे तिला पटते. हा एपिसोड वेबवर आरोग्‍यविषयक आजार व त्‍यासाठी उपायांचा शोध घेणाऱ्या लोकांना सावध करण्यासाठी आहे. माझ्या मते, या एपिसोडमधून भरपूर बोध घेण्‍यासारखे आहे आणि मला खात्री आहे की, प्रेक्षक या विनोदी घटनांमधून हास्‍याचा आनंद घेण्‍यासोबत काहीतरी शिकतीलही.''

राजेश वागळेची भूमिका साकारणारा सुमीत राघवन म्हणाला की, ''आगामी एपिसोड विनोदी ट्विस्‍टसह डोळे उघडणारा आहे. याची पटकथा वाचताना मला गम्मत वाटली. मला खात्री आहे की, प्रेक्षक देखील हा एपिसोड पाहण्‍याचा आनंद घेतील. शेवटी, आपण सर्व कोणत्‍या-ना-कोणत्‍या गोष्‍टीसाठी इंटरनेटचा आधार घेतोच, पण माझ्या मते, ही कथा पटवून देते की काही गोष्‍टींसदर्भात आपण इंटरनेटवर आंधळेपणाने विश्‍वास ठेवणे कसे गैर आहे. राजेश त्‍याच्‍या पत्‍नीच्‍या इंटरनेटवरील अंधविश्‍वासाला कशाप्रकारे दूर करतो हे पाहणे प्रेक्षकांसाठी रोमांचक असणार आहे.''

'वागले की दुनिया – नयी पीढी नये किस्‍से' ही हिंदी मालिका प्रसारित होते दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता सोनी सबवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.