ETV Bharat / sitara

वेब सीरिजसाठी शाहिद कपूरपेक्षा विजय सेतुपतीला मिळणार मोठ्या रक्कमेचा चेक? - राशी खन्ना गोव्यात

विजय सेतुपती आणि शाहिद कपूर आगामी राज आणि डीके यांच्या वेब सिरीजमध्ये काम करीत आहेत. याचे गोव्यात शुटिंग सुरू झाले असून दोघांचे मानधन ऐकूण तुम्हालाही धक्का बसल्या शिवाय राहणार नाही. वेतनश्रेणीचा विचार केला तर शाहिदच्या तुलनेत विजय मोठी रक्कम घरी घेऊन जाणार आहे.

vijay sethupathi
विजय सेतुपती आणि शाहिद कपूर
author img

By

Published : Feb 3, 2021, 5:21 PM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार शाहिद कपूर आणि तामिळ सुपरस्टार विजय सेतुपती एकत्र काम करीत असून राज आणि डीके यांच्या आगामी वेब शोचे ते गोव्यात शुटिंग करीत आहेत. या दोघांच्या भूमिका काय आहेत याबद्दलची माहिती अद्यापही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मात्र त्या दोघांचे मानधन किती आहे या बातम्यांनी मथळे गाजवले आहेत.

गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात वेब सिरीजच्या टीमने गोव्यामध्ये शुटिंगला सुरुवात केली.

Raj & DK's web series
शाहिद कपूर आगामी राज आणि डीके यांच्या वेब सिरीजमध्ये

कबीर सिंगच्या यशानंतर, शाहिद कारकीर्दी सर्वोत्तम टप्प्यात आहे. अभिनेता शाहिद त्याच्या या शोमधून डिजिटल डेब्यू करणार आहे, ज्यासाठी त्याने ४० कोटी रुपये मानधन घेतले आहे. एका वेबसाईटच्या अहवालानुसार, शाहिदच्या करारामध्ये एक बाब समाविष्ट करण्यात आली असून शोच्या पहिल्या भागाला यश मिळाल्यानंतर दुसऱ्या भागात त्याचे मानधन वाढवले जाणार आहे. दुसरीकडे, याच शोसाठी दक्षिणेकडील प्रशंसित सुपरस्टार असलेला विजय हा ५५ कोटी रुपये घरी घेऊन जात असल्याची बातमी आहे.

राज आणि डीकेच्या वेब सीरिजसाठी राशी खन्ना गोव्यात शाहिद कपूरबरोबर शुटिंगसाठी सामील झाली आहे.

Raj & DK's web series
राशी खन्ना राज आणि डीके यांच्या वेब सिरीजमध्ये

शाहिद आणि विजय यांच्या व्यतिरिक्त आगामी शोमध्ये २५ जानेवारी रोजी शुटिंगमध्ये सहभागी झालेली राशी खन्ना मुख्य भूमिकेत आहे.

हेही वाचा - ''ते शेतकरी नाहीत तर दहशतवादी आहेत'', रिहानाला उत्तर देताना बरळली कंगना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.