मुंबई - मराठी नववर्षाची सुरुवात ही 'गुढीपाडवा' या सणाने होते. गुढीपाडवा हा मराठी माणसांच्या अगदी जवळचा सण आहे. त्यामुळे या नव्या वर्षाची ही सुरुवात नव्या भारताची असेल, असे अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटले आहे. उर्मिला यांनी अलिकडेच राजकीय क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे. त्यामुळे या वर्षाची हीच नवी सुरुवात आहे, असे त्या म्हणाल्या.
उर्मिला मातोंडकर यांनी सर्व मराठी बांधव आणि भगिनींना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 'मराठी माणसांच्या चेहऱ्यावरील हसू आणि मनातील आशा नेहमी जिवंत राहावी. यावेळी आपण विजयाचीच गुढी उभारू. तसेच, वर्षभर अनेक चांगल्या बातम्या देत राहील, असा विश्वासही उर्मिलाने व्यक्त केला.