मुंबई - टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक हिने बिग बॉसच्या चौदाव्या हंगामाचे विजेतेपद मिळवले आहे. रुबिनाने अंतिम फेरीत मराठमोळ्या राहुल वैद्यला मात दिली. छोटी बहू आणि शक्ती-अस्तित्व या मालिकांमध्ये रुबिनाने काम केले आहे.
फिल्मसिटी, मुंबई येथे बॉलिवूड अभिनेता सलमान खानने कार्यक्रमाच्या सेटवर विजेता घोषित केला. ३३ वर्षीय रुबिना तिचा अभिनेता-नवरा अभिनव शुक्लासोबत बिग बॉसच्या घरात गेली होती. या कार्यक्रमाच्या सुरूवातीपासूनच ती प्रेक्षकांची निवड होती. चषकव्यतिरिक्त रुबिनाला ३६ लाख रुपयांची रक्कमही देण्यात आली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
रुबिना आणि राहुल वैद्य यांच्याव्यतिरिक्त अभिनेत्री निक्की तम्बोली, अली गोनी आणि राखी सावंत अंतिम फेरी पोहोचल्या होत्या. तम्बोलीला तिसऱ्या तर गोनीला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
हेही वाचा - बीसीसीआयचा धवनसह भारताच्या मर्यादित षटकांच्या खेळाडूंना आदेश!