ETV Bharat / sitara

‘तू सौभाग्यवती हो’ मधील ऐश्वर्याच्या लक्षवेधक 'लक्ष्मी मंगळसूत्राची' होतेय चर्चा! - सोनी मराठी

‘तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये १ जूनपासून विवाह सप्ताह सुरु झालाय. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मोठा थाटमाट दिसत आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच सोनी मराठी वाहिनीवरील 'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये लगीन घाई सुरु झाली आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे कायकाय घडणार आहे, याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढीस लागली आहे.

तू सौभाग्यवती हो
तू सौभाग्यवती हो
author img

By

Published : Jun 2, 2021, 8:11 AM IST

मुंबई - ‘तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये १ जूनपासून विवाह सप्ताह सुरु झालाय. करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांच्या लग्नाचा मोठा थाटमाट दिसत आहे. हळद, मेहेंदी, लग्नात होणारे इतर रीतिरिवाज हे सगळं प्रेक्षकांना ऐश्वर्या आणि सूर्यभान यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे. त्यामुळेच सोनी मराठी वाहिनीवरील 'तू सौभाग्यवती हो' मालिकेमध्ये लगीन घाई सुरु झाली आहे. ऐश्वर्या जाधवांची सून कशी होणार आहे आणि त्यापुढे काय काय घडणार, याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता वाढीस लागली आहे.

'लक्ष्मी मंगळसूत्राची' होतेय चर्चा
'लक्ष्मी मंगळसूत्राची' होतेय चर्चा
ऐश्वर्या आणि सूर्यभान यांचा आगळा वेगळा विवाह सोहळा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. हा विवाह सोहळा फक्त आगळा वेगळा नसून भव्यदिव्य पण आहे. जाधव घराण्याला शोभून दिसेल अशा थाटात हे लग्न होणार आहे. आणि या लग्नात सर्वांचं लक्ष वेधून घेतंय ते म्हणजे ऐश्वर्याचं अनोखं मंगळसूत्र. लक्ष्मीच्या पावलांनी ऐश्वर्या जाधवांच्या घरात प्रवेश करणार आहे. कदाचित याआधीच ऐश्वर्यासाठी खास लक्ष्मीचं मंगळसूत्र बनवलं गेलं असावं. परंतु ऐश्वर्याच्या या लक्षवेधक 'लक्ष्मी मंगळसूत्राची' सर्वत्र चर्चा सुरु झालीय. 'तू सौभाग्यवती हो' ही मालिकेत तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत येतात आणि त्यांच्या गैरहजेरीत झालेल्या सर्व गोष्टी त्यांना कळतात. सूर्यभानवर चित्राचा वाढता प्रभाव आणि एकूण परिस्थिती पाहता आपल्यानंतर या घराची आणि सूर्यभानची काळजी घेणारी कोणीतरी घरात यावी, असं बायजींना वाटू लागतं. दरम्यान घरातच राहणारी चुणचुणीत अल्लड पण तेवढीच समंजस असलेल्या ऐश्वर्याकडे त्यांचं लक्ष जातं. गावकऱ्यांच्या रोषापासून वाचवून सूर्यभान तिला घरात आसरा देतो आणि अनेक वर्षं तिचं कुटुंब जाधवांसाठी काम करत असतं. त्यामुळेच ‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेत सध्या लगीन घाई बघायला मिळत आहे.‘तू सौभाग्यवती हो’ मालिकेतील हा खास विवाह सप्ताह प्रसारित होण्यास सुरुवात झालीय १ जूनपासून आणि तो बघता येईल सोम.-शनि., संध्या. ७ वा. सोनी मराठीवर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.