मुंबई - 'द फॅमिली मॅन' वेब सिरीजचा नायक मनोज बाजपेयी याने पहिल्यांदाच या चित्रपटाला तमिळ भाषिकाकडून होत असलेल्या विरोधाबद्दल भाष्य केले आहे. 'द फॅमिली मॅन' ही मालिका तमिळ लोकांना कमी लेखणारी आणि लिबरेशन टायगर फॉर तमिळ इलम (एलटीटीई) या संघटनेला दहशतवादी समजणारी असल्याचा आरोप केला गेला आहे. या पार्श्वभूमीवर मनोज बाजपेयींनी मौन सोडले आहे.
'द फॅमिली मॅन' या वेबसिरीजवर बंदी घालण्याची मागणी तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयालाकडे केली आहे. यात तमिळ इलमला नकारात्मक दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
मालिकेमध्ये आघाडीची भूमिका साकारणाऱ्या मनोज बाजपेयीने एका वेबलोइडला दिलेल्या आभासी मुलाखतीत म्हटले आहे की, मालिकेच्या टीमच्या लीडर्सनी अत्यंत काळजी घेतली आहे आणि तमिळ संस्कृती आणि संवेदनशीलतेबद्दल आदर दर्शविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.
या वादावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता मनोज बाजपेयी म्हणाला, ''हमारे टीम में जो मेन लीडर है, जो लीड कर रहें है इस शो को, खास कर के सिझन टू को, ये जादातर तमिलीयन्स है. (आमच्या टीमचे जे मुख्य लीडर आहेत, जे या शोला लीड करीत आहेत, खास करुन या सिझन २ ला, त्यातील अधिकतर तमिळीयन्स आहेत.) राज आणि डीके, सामंथा अकिनेनी, प्रियामणी, सुमन (कुमार) जे याचा लेखक आहेत आणि तमिळ लोक, मित्र आणि प्रेक्षक यांच्या तमिळ अस्मितेबद्दल चांगले जाणकार आहेत. मला वाटत नाही की त्यांच्या पेक्षा अधिक चांगले जाणकार कोणी असेल. हे लोकच या शोचे नेतृत्व करीत आहेत. त्यांनी हा शो तयार केला आहे आणि त्यांनी तमिळ संस्कृती आणि संवेदनशीलतेबद्दल आदर दर्शविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. "
या वेब सिरीजमध्ये एनआयए एजंट श्रीकांत तिवारीची भूमिका साकारणाऱ्या मनोज बाजपेयीने प्रेक्षकांना आश्वासन दिलंय की 'द फॅमिली मॅन-२' हाून तुम्हाला अभिमान वाटेल, कारण शोचे निर्माते विविधतेवर विश्वास ठेवतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
"आपल्याला या शोचा खूप अभिमान वाटेल. ही एक मालिका आहे जी विविधतेवर विश्वास ठेवते. कृपया हा कार्यक्रम पहा आणि आपल्याला निश्चितपणे या शोबद्दल खूप अभिमान वाटेल आणि निर्माते तमिळ संस्कृती आणि संवेदनशीलतेबद्दल किती अभिमान बाळगतात हेदेखील लक्षात येईल.", असे मनोज म्हणाला.
प्रियामणी राज, शरब हाश्मी, सीमा विश्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा आणि श्रेया धनवंतरी यांच्यासह मनोज बाजपेयी 'द फॅमिली मॅन २' मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 4 जून रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होणाऱ्या या शोमध्ये दक्षिण स्टार समांथा अक्केनेनी पहिल्यांदाच डिजिटल पदार्पण करीत आहे.
हेही वाचा - द फॅमिली मॅन २' चे प्रसारण थांबवा अन्यथा होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार - वायको