पाठीत खंजीर खुपसणे बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नित्याचे आहे. कधी कोणावर विश्वास ठेवावा याबाबत सदस्य संभ्रमात असतात. कोण आपल्या बाजूने खरंच आहे आणि कोण असल्याचा आव आणत आहे हे हळूहळू काही काळ गेल्यानंतर कळून चुकतं. स्नेहा बर्याचदा जयला सांगताना दिसते की, तिचा फक्त जयवरच विश्वास आहे बाकी कोणावर नाही. मग उत्कर्ष असो, वा बाकीचे त्यांच्या गटातील स्पर्धक असो. जय म्हणाला, “काल जी गोष्ट झाली ना... Loyalty ची गोष्ट वेगळी आहे. मी आता उत्कर्षला देखील सांगितलं. नको ठेऊस विश्वास बाकीच्यांवर.”
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नव्याने एंट्री झालेल्या आजीने घरामध्ये जादूचा दिवा ठेवला आणि सदस्यांना एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी दिली, “इच्छा माझी पुरी करा” या नॉमिनेशन कार्यांतर्गत. या कार्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले संतोष चौधरी (दादूस), विकास पाटील, आदिश वैद्य आणि मीनल शाह. तसेच “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य सुद्धा रंगतेय. जो एक सदस्य सर्व फेर्यांमध्ये भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरेल तो सदस्य कॅप्टन पदाचा पहिला उमेदवार ठरणार आहे.
“इच्छा माझी पुरी करा” या नॉमिनेशन कार्यात आदिश वैद्यने आविष्कार दारव्हेकरला वाचवले. ज्यावरून विकास, सोनाली, मीनल आणि विकास यांची जोरदार चर्चा रंगली. विकास म्हणाला, “जसं टिचिंग टास्कमध्ये झालं, तो डबल गेम खेळतो आहे.” विशाल, सोनाली आणि मीनल यांनी देखील सहमत दर्शविली.
बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होतो.
हेही वाचा - वन्यजीवाच्या नाट्यमय कथांना विनोदी ट्विस्ट देणारी रिअल लाइफ ड्रामा सिरीज 'सेरेंगेटी २’!