क्रिकेट आणि मनोरंजनक्षेत्र हातात हात घालून चालत असतात. जितके ग्लॅमर मनोरंजनसृष्टीत आहे तितकेच प्रसिद्धी वलय क्रिकेट क्षेत्रात आहे. क्रिकेट आणि एंटरटेन्मेन्ट यांची सांगड घालत एक वेब सिरीज ‘इनसाइड एज’ (Inside Edge) आली होती जिला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. साहजिकच त्याचा दुसरा सिझन आला आणि त्यालाही प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसाद मिळाला. आता प्राईम व्हिडिओ आणि एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट (Prime Video and Excel Media & Entertainment) ‘इनसाइड एज’ या वेब सिरीजचा तिसरा सिझन (third season of the web series Inside Edge)घेऊन आले आहेत. क्रिकेटमधील कट्टर दुस्मानी असलेले भारत आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले दिसतील. यावरूनच कल्पना येईल की या सिरीज मध्ये नाट्य किती असणार आहे.
धमाकेदार हॅट्रिक साधत प्राईम व्हिडिओ आणि एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंट (Prime Video and Excel Media & Entertainment) यांनी आज बहुप्रतीक्षीत अमेझॉन ओरिजनल सीरीज 'इनसाइड एज'च्या (Amazon Original Series 'Inside Edge')तिसऱ्या सीझनच्या जबरदस्त ट्रेलरचे ('Inside Age' Season 3 Trailer)अनावरण केले. करण अंशुमान यांची निर्मिती, तर कनिष्क वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या या नव्या सीझनमध्ये बरंच काही पणाला लागलं असून दोन कट्टर प्रतीस्पर्ध्यांमधला खेळ आणखी रंगतदार होणार असल्याची चिन्हं आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दोन्ही प्रतिस्पर्ध्यांमधील दुष्मनी मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेरही आणखी तीव्र होत असताना भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाशी संबंधित काही गडद रहस्ये उलगडणार आहेत. पहिल्या दोन्ही सीझन्सच्या घवघवीत यशानंतर ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे तिसऱ्या सीझनमध्ये आणखी सरप्राइजेस, आणखी रहस्य, भरपूर मनोरंजन व नाट्य पाहायला मिळणार आहे. याच कारण आहे या सिझन मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका दिसणार आहे.
"इनसाइड एजच्या प्रत्येक नव्या सीझनमध्ये आशयाची पातळी उंचावण्याचा, नवी कथानकं, व्यक्तीरेखा तसंच प्रेक्षकांना भुरळ घालणारा विसंवाद दाखवण्याचा हेतू आहे. विक्रांत भाईसाहेबच्या सामन्यापासून मुंबई मेव्हरिकच्या भारतीय क्रिकेटमधल्या मोठ्या लीगमधील पुढच्या मार्गापर्यंत कथानक आणखी गडद झाले असून त्यातून प्रेक्षकांना धक्का देणाऱ्या गोष्टी घडतील व रहस्यं उलगडतील. हा सीझन रहस्यमय आणि नाट्यपूर्ण व्हावा यासाठी सगळ्या टीमनं खूप मेहनत घेतली असून सीरीजबद्दलची उत्सुकता टिकून राहील अशी मला आशा वाटते", असे निर्माते करण अंशुमान म्हणाले.
दिग्दर्शक कनिष्क वर्मा म्हणाले, "इनसाइड एजला अगदी पहिल्या सीझनपासून आपल्या चाहत्यांकडून मिळालेले प्रेम भारावणारे आहे आणि या सीझनसह आम्ही त्यांच्या उत्सुकतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही प्रत्येक व्यक्तीरेखा कथानकाला साजेशी दर्शवण्यावर भर दिला असून त्या पडद्यावर पाहाताक्षणी प्रेक्षक त्यांच्याशी जोडला जातो आणि ज्या निर्णायक क्षणी गोष्ट थांबली होती, त्याची आठवण करून देतो. सीझन ३ मध्ये मैदानात तसंच मैदानाबाहेर नवी रहस्यं आणि नवे डावपेच उलगडताना पाहायला मिळतील."
२४० देश प्रदेशातील प्राइम सदस्यांना ३ डिसेंबर २०२१ पासून 'इनसाइड एज' सीझन ३ च्या अमेझॉन ओरिजनल सीरीजचे दहा एपिसोड स्ट्रीम करता येणार आहेत.
हेही वाचा - 'जय भीम'च्या दिग्दर्शकाने मागितली माफी, जाणून घ्या काय आहे प्रकरण...