माधुरी दीक्षितने नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी'चे अधिकृतरीत्या उदघाटन केले. त्यानंतर प्लॅटफॉर्म्सच्या अनेक वेब सिरीजच्या प्रदर्शनाची लगबग सुरु झाली आहे. आता 'प्लॅनेट मराठी ओटीटी' ची 'बाप बीप बाप' ही नवीन वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरिजमधील वडील व मुलाच्या नात्यातील सुंदर प्रवासाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून या वेबसीरिजमधील 'वय नाही' हे धमाल गाणे सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. हे गाणे प्रत्येक पालकाने ऐकावे असे आहे.
मुलगा आणि वडील यांच्या नात्यात काही गोष्टी समजून उमजून केल्या तर त्यांच्यातील जनरेशन गॅप नकळत मिटत जाते. त्या दोघांच्या नात्यात एक मैत्रीचे बंध आपसूकच निर्माण करणारे हे गाणे आहे. हे भन्नाट गाणे अवधूत गुप्ते आणि रोहन-रोहन यांनी गायले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'बाप बीप बाप'मध्ये वडिलांची भूमिका साकारणारे शरद पोंक्षे संगणक हाताळताना, व्यायाम करताना, आपल्या मुलाबरोबर आणि त्याच्या मित्रांमध्ये मिसळण्याचा, मुलाच्या रिलेशनशिपला स्वीकारताना दिसत आहेत. ते ज्या ज्या गोष्टी करत आहेत त्यातून दिसतेय की, वय हा केवळ एक आकडा आहे. मुलांशी समवयस्क होऊन वडिलांनी त्यांच्याशी जवळीक साधली तर हे नाते अधिक बहरू शकते, अशा पद्धतीचे हे गाणे आहे. या गाण्याला रोहन-रोहन यांनी संगीत दिले आहे.
'वय नाही'या गाण्याबद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, ''वडील-मुलाच्या नात्यात नाही म्हटले तरी एक दरी असते. ही दरी मिटवून हे नाते अधिक घट्ट करण्याचा आणि या अबोल नात्यावर भाष्य करणारे 'वय नाही' हे गाणे आहे. हे एक धमाल गाणे असून वडील -मुलाच्या नात्याला एक नवे वळण देणारे हे गाणे आहे. प्रत्येक पाल्य -पालकाने पाहावी अशी 'बाप बीप बाप' ही वेबसीरिज आहे.''
हेही वाचा - 'थलायवी' पाहून कंगनाचे आई वडिल म्हणाले, 5 व्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी सज्ज रहा