ETV Bharat / sitara

सेटवरील प्रसिद्ध कलाकार आता दिसणार 'अंगत पंगत' च्या किचनमध्ये! - 'अंगत पंगत' च्या किचनमध्ये

फक्त मराठी वाहिनीने आपल्या कलावंत तंत्रज्ञांच्या आरोग्याचा विचार करून तात्काळ सर्व मालिकांचे चित्रीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येऊ घातलेल्या 'अंगत पंगत' या खाद्य परंपरेवर आधारित आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे प्रसारण लांबणीवर गेले. आता हा शो येत्या १७ मे पासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर प्रसारित प्रसारित होणार आहे.

In the kitchen of 'Angat Pangat'
'अंगत पंगत' च्या किचनमध्ये
author img

By

Published : May 14, 2021, 7:47 PM IST

यावर्षीच्या सुरुवातीला लवकरच सारं काही आलबेल होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि अनेक निर्मात्यांनी आपल्या नवीन कार्यक्रमांची तयारी देखील सुरु केली होती. फक्त मराठी वर येऊ घातलेल्या ‘अंगत पंगत’ या ‘कुकरी शो’ चे सुद्धा शूट सुरु झाले होते. परंतु कोरोना ने पुन्हा उसळी मारली आणि मनोरंजनसृष्टीतील अनेकांची वेळापत्रक कोलमडली. त्यातीलच एक म्हणजे 'अंगत पंगत' हा कार्यक्रम. त्याचे काही भाग चित्रीतही झाले, परंतु याच काळात मुंबईसह महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाले.

वाहिनीने आपल्या कलावंत तंत्रज्ञांच्या आरोग्याचा विचार करून तात्काळ सर्व मालिकांचे चित्रीकरण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येऊ घातलेल्या 'अंगत पंगत' या खाद्य परंपरेवर आधारित आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे प्रसारण लांबणीवर गेले. आता हा शो येत्या १७ मे पासून ‘फक्त मराठी वाहिनी’वर सोमवार ते शुक्रवार दुपारी २:०० वाजता, प्रसारित प्रसारित होणार आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक्सिक्युटीव्ह शेफ शंतनू गुप्ते 'अंगत पंगत'मध्ये भारतीय पदार्त्यांसोबतच मॉडर्न युरोपियन रेसिपी प्रेक्षकांना तयार करून दाखविणार आहेत. त्यांनी युरोपमधील 'नॉर्थ नॉर्वे' विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय अभिनेत्री सायली देवधर करीत आहे. तिचे खुमासदार सूत्रसंचालन 'अंगत पंगत' अधिकच रुचकर करणार आहे.

या शो मध्ये दर शुक्रवारी आपल्या आवडत्या सेलिब्रेटींच्या आवडीचे पदार्थ ते स्वतः करून दाखविणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते संजय मोने, संदीप पाठक, रुपाली भोसले, स्नेहा रायकर, दीप्ती भागवत, ‘सप्तपदी’ मालिकेची नायिका तृप्ती देवरे असे अनेक लोकप्रिय कलाकार आपले आवडते पदार्थ बनवताना दिसतील आणि त्यासोबत मनमोकळ्या गप्पांतून सवांद साधतील.

स्वादिष्ट आणि तृप्त करणाऱ्या खमंग पाककलांची बहारदार रेसिपी 'अंगत पंगत' या शोमध्ये पाहता येईल. तीन वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपीज असतील. या तिन्ही रेसिपी एकाच घटक पदार्थापासून तयार केल्या जाणार आहेत. यात पहिला विभाग - वदनी कवळ - अर्थात देशी, आपल्या मातीतले पदार्थ असतील. दुसरा विभाग - मिक्स मेजवानी - अर्थात फ्यूजन रेसिपीचा आणि तिसरा विभाग - सातासमुद्रापार - यात सातासमुद्रापलीकडील पदार्थांची ओळख होणार आहे.

महाराष्ट्रासह जगभरातील खवय्यांसाठी खमंग चवदार रेसिपी 'अंगत पंगत' या कार्यक्रमातून शिकता येईल. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामध्ये संपूर्ण कुटुंबाला एकत्रित, गप्पा मारत हा शो पहाता येईल. आपल्या आवडीच्या खाद्य पदार्थांची रेसिपी, त्यांचा इतिहास, तसेच एकाच घटक पदार्थापासून महाराष्ट्रातील ग्रामीण, शहरी व विदेशात कसा व कोणता पदार्थ तयार केला जातो याची रंजक माहिती घेता येईल.

'अंगत पंगत' या शोची निर्मिती निखिल रायबोले, भुपेंद्रकुमार नंदन यांच्या 'कॅफे मराठी' या संस्थेची असून दिग्दर्शन हेमंत तांबे यांचे आहे. प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी या 'अंगत पंगत'चे शीर्षक गीत लिहिले असून संगीतकार रोहित नागभिडे यांनी ते संगीतबद्ध केले आहे. 'अंगत पंगत'चं लेखन अभिजित पेंढारकर यांचं असून छायांकन - नरेश राम शिवगन यांनी केले आहे. या शोची आकर्षक सजावट कलादिग्दर्शिका तृप्ती ताम्हाणे यांनी केले असून संकलन मनीष शिर्के, सिद्धेश हडकर यांचे आहे. या शो साठी 'फक्त मराठी वाहिनी'चे वरिष्ठ कार्यकारी निर्माता संकेत पावसे तर बिझनेस हेड शाम मळेकर आहेत.

रुचकर आणि स्वादिष्ट 'अंगत पंगत' हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे 'फक्त मराठी वाहिनी' वर.

हेही वाचा - गरजूंच्या मदतीला रस्त्यावर उतरला गायक मिका सिंग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.