बिग बॉसच्या घरात बाहेरील संपर्क तुटल्यामुळे अनेक सदस्य लॉजिक विसरून वागताना दिसतात. नुकत्याच सुरु झालेल्या बिग बॉस मराठीच्या घरामध्येसुद्धा कधी कधी सदस्यांना कळत नाही नक्की कसं वागावं, कोणावर विश्वास ठेवावा, कोण आपल्या बाजूने बोलत आहे. घरामध्ये असं कोणी तरी हवं ज्याच्या बरोबर तुम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करू शकता, जो तुम्हाला सल्ला देखील देऊ शकेल.
कोणाच्या दबावामुळे एखादा सदस्य एकदम शांत होतो आणि ही गोष्ट घरातील इतर सदस्य पाहत असतात. अशावेळी ग्रुपमधले सदस्य, घरातील मित्र काही मोलाचा सल्ला देतात ज्यामुळे त्यांना पुन्हा एकदा उभारी येते. तसंच काहीसं पुन्हा होताना दिसणार आहे. विशाल, सोनाली आणि मीनल याबद्दल बोलताना दिसला, ज्यामध्ये तो सोनालीला मोलाचा सल्ला देणार आहे.
सोनाली तिच्या मनातील गोष्ट आज विशाल आणि मीनलला सांगताना दिसणार आहे. सोनाली विशाल सांगणार आहे, “टेंशन वाढवून ठेवलं आहे, ही बाई शहाणी नाहीये. मेंटल टॉर्चर करते. विशाल सोनालीला सांगणार, आहे “तू नको हाऊस. तू कोणालाही बांधील नाहीयेस. तुला अक्कल आहे का? टास्कमध्ये तुझं काम होतं तिकडच्या पोरांना खिळवून ठेवायला हवं होतंस. सगळेजण तिच्यावर भिडत होते. आम्हांला माहिती आहे तुझी मेंटल परिस्थिति काय आहे. आम्ही समजून घेऊ. पण, बाहेर प्रेक्षकांना काय दिसत असेल? सोनाली पाटीलने पहिल्या आठवड्यात नखरे केले आणि दुसर्या आठवड्यात फूल डाऊन. तू मध्ये कुठेच दिसत नाहीस. तुला जोडी दिल्यापासून तू... विकासला देखील तुला हेच सांगायचं आहे. मी काळजीपोटी सांगतो आहे. ही कोणाची नाही तुला कळलं आहे ना मग काही फरक पडत नाही”.
आता नक्की हे कोणाबद्दल बोलत आहेत व कोणामुळे सोनालीला त्रास होतो आहे तसेच विशाल कोणाबद्दल बोलतो आहे हे पुढील भागामध्ये कळेलच. बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होतो.
हेही वाचा - बिग बॉस मराठी : सुरेख कुडची म्हणाल्या 'खेळताना दिसलो पाहिज, कॅप्टन बनण्याची हौस नाही’