ETV Bharat / sitara

तमाशा कलावंत दत्ता महाडिक यांच्या संपूर्ण कुटुंबावर भाजीपाला विक्रीची वेळ

तमाशा पंढरी अशी ओळख असलेल्या जुन्नर तालुक्यात तमाशा कलावंत दिवंगत दत्ता महाडिक पुणे यांच्या संपूर्ण कुटुंबावर भाजीपाला विक्रीची वेळ आली आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावातील रस्त्यावर भाजीपाला,फळे विक्रीचा व्यवसाय सुरु करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु केलाय.

author img

By

Published : Apr 27, 2021, 5:15 PM IST

Time to sell vegetables to the artist family
कलावंत कुटुंबावर भाजीपाला विक्रीची वेळ

नारायणगाव (पुणे) - जुन्नर तालुक्याला तमाशाचा एक वेगळा इतिहास आहे. याच जुन्नर तालुक्यातुन तमाशाचे अनेक कलावंत घडले. मात्र याच तमाशा पंढरीत तमाशा कलावंत दिवंगत दत्ता महाडिक पुणे यांच्या संपूर्ण कुटुंबावर भाजीपाला विक्रीची वेळ आली आहे. जुन्नर तालुक्यातील बेल्हे गावातील रस्त्यावर भाजीपाला,फळे विक्रीचा व्यवसाय सुरु करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरु केलाय.

गुढीपाडव्याच्या मोहर्तावर पश्चिम महाराष्ट्रात जत्रा यात्रा सुरु होतात. मात्र यंदा कोरोना महामारीच्या संकटामुळे या उत्सवांवर बंदी आलीय. परिणामी तमाशाचे फडही बंद झाल्याने तमाशाच्या फडावर तमाशा कलावंतासह अनेकांच्या संसाराचा गाडा याच तमाशावर चालतोय. परंतु वर्षभरापासुन तमाशावर आलेल्या बंदीने अनेक कलावंतांची आपली कला बाजुला ठेवुन पोटाचं खळगं भरण्यासाठी वेगवेगळे व्यवसाय सुरु केले आहेत.

कलावंत कुटुंबावर भाजीपाला विक्रीची वेळ

तमाशाच्या कलेला सातासमुद्रापार घेऊन जाणारे शाहिर म्हणुन ओळख असलेल्या दत्ता महाडिंग पुणेकर यांच्या तमाशा फडावर आता संक्रातच आली आहे. त्यामुळे कलाकार तर बेरोजगार झालेच पण कुटुंबालाही रस्त्यावर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याची वेळ आलीय. डोक्यावरील कर्ज घेऊन संसाराचा गाडा आता चालवायचा कसा असा गंभीर प्रश्न यांच्या समोर उभा आहे.

दिवंगत दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा फड मागील चार पिढ्यांपासून आपली कला सादर करत आहे. यात गायक, लेखन, पटकथा, ढोलकीपट्टू अशी वेगळी ओळख असणाऱ्या कलावंताची कोरोना महामारीच्या संकटात वाताहाट झाली. पत्नी मुलगी यांच्या समवेत दिवसभर भर उन्हात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करण्याची वेळ आली आहे. तमाशाच्या संसाराचा गाडा चालवत असताना आता डोळ्यातून येणारे अश्रुही आता थांबण्याचे नाव घेत नाहीत.

तमाशाची कला पन्नास वर्षापासुन जोपासत असताना राज्यात पडणारा दुष्काळ,जत्रा यात्रांवर आलेली संकटं यामुळे तमाशांना चांगलं दिवस राहिले नाहीत. त्यात नव्याने कोरोना महामारीचे संकट उभं राहिले त्यामुळे तमाशा सुरु कधी होणार असा प्रश्न असताना आता खुद्द तमाशा फड मालकच मिळेल त्या व्यवसायाकडे वळले आहेत. तर इतर कलाकारांचे काय असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे.

महाराष्ट्राची लोककला जोपासणारे प्रसिद्ध कलावंतच आज देशोधडीला लागलेत. त्यामुळे मायबाप सरकारने तमाशाची लोककला जोपासणा-या या कलावंतांना वेळीच मदतीचा हात देण्याची गरज आहे. अन्यथा हा कलावंत पुन्हा कधीच उभा रहाणार नाही आणि ही लोककला लोप पावेल, हेच या निमित्ताने सांगावं लागेल.

हेही वाचा - मराठी अभिनेते पुंडलिक पालवे यांचा कोरोनाने घेतला बळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.