ETV Bharat / sitara

'तैश'च्या शूटिंगला सुरुवात, हर्षवर्धन राणे, जीम सर्भ आणि पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत

'वजीर' चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे बिजॉय नंबियर यावेळी 'तैश'च्या माध्यमातून रिवेंज ड्रामा प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत.

'तैश'च्या शूटिंगला सुरुवात, हर्षवर्धन राणे, जीम सर्भ आणि पुलकित सम्राट मुख्य भूमिकेत
author img

By

Published : Jul 30, 2019, 6:01 PM IST

मुंबई - दिग्दर्शक बिजॉय नंबियर यांच्या आगामी 'तैश' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. अभिनेता पुलकित सम्राट, हर्षवर्धन राणे आणि पुलकित सम्राट हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरचा पहिला फोटो नुकताच समोर आला आहे.

चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'वजीर' चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे बिजॉय नंबियर यावेळी 'तैश'च्या माध्यमातून रिवेंज ड्रामा प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत. या चित्रपटात क्रिती खरबंदा आणि संजीदा शेख तसेच सलोनी बत्रा या अभिनेत्री देखील झळकणार आहेत.

या चित्रपटाचे शूटिंग लंडन येथे होणार आहे. त्यासाठी चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट लंडनला रवाना झाली आहे.

  • #Announcement: Pulkit Samrat, Jim Sarbh, Harshvardhan Rane, Kriti Kharbanda and Sanjeeda Sheikh... #Taish shooting commences... Directed by Bejoy Nambiar... Produced by Bejoy Nambiar, Shivanshu Pandey and Deepak Mukut... Ease My Trip and Getaway Pictures presentation. pic.twitter.com/iyRb2XezD7

    — taran adarsh (@taran_adarsh) July 30, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'सनम तेरी कसम' मधुन प्रसिद्धीस आलेला हर्षवर्धन राणे या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी तो अभिनेत्री किम शर्मा हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

जीम सर्भ हा 'पद्मावत', 'संजू' चित्रपटात दिसला होता. तर, पुलकित सम्राट देखील 'सनम रे' चित्रपटातून नावारूपास आला आहे.

आता 'तैश' मध्ये तिघेही एकत्र आले आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.