ETV Bharat / sitara

...म्हणून सुझान खानने नाकारले होते अभिनयाचे क्षेत्र - neha dhupia

एक अभिनेत्री बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी सुझानकडे होत्या. सुंदर चेहरा, व्यक्तीमत्व, टॅलेंट, अभिनयाचा वारसा, इतके असुनही ती अभिनयाकडे वळली नाही.

...म्हणून सुझान खानने नाकारले होते अभिनयाचे क्षेत्र
author img

By

Published : May 7, 2019, 11:26 AM IST

मुंबई - ह्रतिक रोशन आणि सुझान खान हे नाव ग्लमरच्या जगात सुप्रसिद्ध आहे. तरीही सुझान अभिनयाकडे न वळता इंटेरिअर डिझायनिंगच्या क्षेत्रात उतरली. यामागचे कारण तिने उलगडले आहे. नेहा धुपियाच्या चाट शो मध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला.

एक अभिनेत्री बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी सुझानकडे होत्या. सुंदर चेहरा, व्यक्तीमत्व, टॅलेंट, अभिनयाचा वारसा, इतके असुनही ती अभिनयाकडे वळली नाही. याचे कारण तिने सांगितले आहे. की 'माझी आई इंटेरिअर डिझायनर होती. तिच्यासोबत मी या कामाचा जवळून अनुभव घेतला. या करिअरने लहानपणीच माझ्यावर प्रभाव पाडला. तेव्हाच मी या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला अभिनयाचे आकर्षण वाटले नाही.

'पुढे ह्रतिक रोशनसोबत ओळख झाली. त्यावेळी तो सुपरस्टार नव्हता. मात्र माझ्यासाठी तो नेहमीच सुपरस्टार आहे. त्याच्यामुळे या ग्लॅमरच्या जगाशी मी पुन्हा जोडली गेली', असेही ती म्हणाली. 'मला इंटेरिअर डिझायनिंगच आवडतं, त्यामुळे मी कधीही अभिनयाकडे वळली नाही', असे तिने या कार्यक्रमात सांगितले.

ह्रतिक आणि सुझान यांचे तब्बल १७ वर्षांचे नाते तुटल्यानंतर अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. त्यांच्या वेगळे होण्याचे कारण दोघांनीही सांगितले नाही. मात्र, घटस्फोटानंतरही ते दोघे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्या मुलांसोबत ते एकत्रच वेळ घालवताना दिसतात.

Intro:Body:

ent 06

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.