मुंबई - सनी लिओनची भूमिका असलेल्या 'अनामिका' या निर्माता विक्रम भट्ट यांच्या वेब सीरिजचे शूटिंग सुरू झाले आहे. भट्ट म्हणाले, "लॉकडाऊनमुळे शूट काही काळ थांबले होते. पण उद्योग कधीच थांबत नाही. म्हणून आम्ही पुन्हा कामावर परतलो आहोत. आम्ही नुकतेच सनीबरोबर शूटिंग सुरू केले आहे. ही एक विलक्षण आणि उत्साहवर्धक सुरुवात आहे. सनी लिओनीला मार्शल आर्ट करीत शस्त्र चालवत असताना या सिरीजमध्ये प्रेक्षक पाहून शकतील. हा एक थरारक अॅक्शन-पॅक प्रोजेक्ट आहे. "
अनामिका ही १० भागांची गन-फू अॅक्शन मालिका आहे. सनी पहिल्यांदाच अॅक्शन अवतारमध्ये दिसली आहे. या मालिकेचे चित्रीकरण मुंबईत होणार आहे. पहिले शेड्यूल वर्षाच्या अखेरीस समाप्त होईल.
हेही वाचा - अंतिम' फर्स्ट लूक : सलमान खान भिडला मेव्हणा आयुष शर्मासोबत
विक्रम भट्ट यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या या मालिकेची निर्मिती भट्ट आणि त्यांची मुलगी कृष्णा भट्ट यांनी केली आहे. ही वेब सिरीज एमएक्स प्लेयरवर रिलीज केली जाईल.
हेही वाचा - 'अतरंगी रे'साठी शाहजहांच्या अवतारात अक्षय कुमार