ETV Bharat / sitara

कार्तिकी गायकवाड लग्नानंतर 'या' कारणामुळे देखील सध्या आहे चर्चेत

'स्टार प्रवाह'वर लवकरच सुरू होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे प्रोमोज एव्हाना टीव्हीवर दिसायला लागले आहेत. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत संगीतबद्ध करण्यात आलं.

author img

By

Published : Jul 29, 2020, 7:51 PM IST

कार्तिकी गायकवाड
कार्तिकी गायकवाड

मुंबई - नुकतीच विवाहबद्ध झालेली गायिका कार्तिकी गायकवाड सध्या अजून एका कारणासाठी चर्चेत आहे. 'स्टार प्रवाह'वर लवकरच सुरू होणाऱ्या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेचे प्रोमोज एव्हाना टीव्हीवर दिसायला लागले आहेत. नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत संगीतबद्ध करण्यात आलं. स्टार प्रवाह प्रस्तुत आणि कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेचं शीर्षकगीत कार्तिकी गायकवाडच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आलं आहे. गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी हे शीर्षकगीत लिहिलं असून पंकज पडघण यांनी हे शीर्षकगीत संगीतबद्ध केलं आहे.

या गाण्याच्या अनुभवाविषयी सांगताना कार्तिकी म्हणाली, ‘मी याआधी बऱ्याच अल्बम्स, नाटक आणि सिनेमांसाठी गाणी गायली आहेत मात्र, शीर्षकगीत गाण्याची ही माझी पहिलीच वेळ. या संधी बद्दल स्टार प्रवाह आणि कोठारे व्हिजन्सचे आभार. सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचं शीर्षकगीत अतिशय सुंदर आहे अगदी पुन्हा पुन्हा गुणगुणावं असं. गाणं ऐकायला जितकं सुंदर आहे तितकंच ते गाण्यासाठी कठीण होतं. शीर्षकगीताच्या निमित्ताने या मालिकेचा एक भाग होता आला याचा आनंद आहे.’

मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांना एक वेगळी लोकप्रियता असते, त्यातही महेश कोठारे यांच्या मालिकांची सर्वच शीर्षकगीते कायमच लोकप्रिय ठरली आहेत. अशात सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेचं शिर्षकगीत हीच परंपरा कायम राखणार का याची उत्सुकता कायम आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.