ETV Bharat / sitara

'तमाशा लाईव्ह'मध्ये असणार 30 गाणी, सोनाली कुलकर्णी दाखवणार जलवा - Sonali Kulkarni starrer 'Tamasha Live'

सोनाली कुलकर्णी हिची मुख्य भूमिका असलेल्या तमाशा लाईव्ह चित्रपटाचे पोस्टर प्लॅनेट मराठी ओटीटी वर रिलीज करण्यात आले आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशियो फिल्म या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

Sonali Kulkarni
सोनाली कुलकर्णी
author img

By

Published : Aug 9, 2021, 6:57 PM IST

मुंबई - सोनाली कुलकर्णी हिची मुख्य भूमिका असलेल्या तमाशा लाईव्ह चित्रपटाचे पोस्टर प्लॅनेट मराठी ओटीटी वर रिलीज करण्यात आले आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशियो फिल्म या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. संजय जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.

याबद्दल बोलताना सोनाली म्हणाली, 'तमाशा लाइव्ह मराठी चित्रपटांची भव्यता पुन्हा एकदा पडद्यावर सिध्द करेल. चित्रपटातील प्रत्येक तपशीलावर बारीक आणि सर्वोत्तम काम करण्यात आले आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक नक्कीच आमचे प्रयत्न पाहतील. प्लॅनेट मराठी हे मराठी आशयाचे पॉवरहाऊस आहे आणि त्याच्या चित्रपटाचा एक भाग म्हणून मला आनंद झाला आहे. यापूर्वी कधीही न पाहिलेला एक संगीतमय चित्रपट नक्कीच आपल्या प्रेक्षकांच्या हृदयावर आणि मनावर राज्य करेल.

चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सोनालीचे एक स्केच दाखवण्यात आले आहे.तमाशा लाइव्ह हा संगीतमय मराठी चित्रपट आहे. या थ्रिलर कथेमध्ये ग्लॅमरची भर पडेल. या चित्रपटात तब्बल 30 हृदयस्पर्शी गाणी असतील. या गाण्ंचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे असून अमितराज आणि पंकज पडघन यांचे संगीत असेल. दिग्दर्शक संजय जाधव यांनी तमाशा लाइव्ह हा एक अनोखा चित्रपट असल्याचे म्हटले आहे.

संजय जाधव म्हणाले, "खरोखर यापूर्वी कधीही कोणीही मराठी चित्रपट निर्माता किंवा दिग्दर्शकाने 30 पेक्षा जास्त गाणी असलेला मोठा संगीत चित्रपट केला नाही. प्लॅनेट मराठी आणि माझी मैत्रिण सोनाली कुलकर्णी यांच्यासोबत काम करणे आश्चर्यकारक आहे. माझी आणि सोनालीची ही पहिलीच एकत्र काम करण्याची वेळ आहे. म्हणूनच हा चित्रपट मला खूप उत्साह आणि आनंद देतो.

चित्रपटाचे लेखन मनीष कदम यांनी केले असून संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. या चित्रपटाची कोरिओग्राफी ख्यातनाम नृत्यदिग्दर्शन उमेश जाधव यांनी केली आहे. दिग्दर्शक संजय जाधव यांनी तमाशा लाईव्हची पटकथाही केली आहे. ब्लॉकबस्टर वेब-सिरीज 'अनुराधा'चे शूटिंग पूर्ण केल्यानंतर जाधव आणि प्लॅनेट मराठी या प्रोजेक्टसाठी पुन्हा एकत्र आले आहेत.

अक्षय बदरपूरकर, अभयानंद सिंह आणि पियुष सिंग हे चित्रपटाचे निर्माते आहेत. या तिघांनी याआधीच हिट मराठी चित्रपट 'एबी आणि सीडी' एकत्र केला आहे.

हेही वाचा - ठाकूर सज्जन सिंह उर्फ अभिनेता अनुपम श्याम यांचे निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.