हैदराबाद - सोशल मीडियावर कधी कोण प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात येईल सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या सहदेव दिरदो याच्या 'बचपन का प्यार' गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. सहदेव दिरदोही संपूर्ण भारतात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला होता. त्यावेळी प्रत्येक जण 'बचपन का प्यार' गाणे गुणगुणत होते. त्याचपद्धतीने सध्या एक तरुण गायिका सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिच्या एका गाण्याची क्लिप तुफान व्हायरल होत आहे. तुम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक, यू ट्रयुब व ट्विटर सर्वत्र मधूर आवाजाच्या तरुणीची क्लिप पाहायला मिळेल.
काही दिवसांपूर्वी ‘मणिके मागे हिथे’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे. या गाण्याने नेटकऱ्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांन वेड लावलं आहे. बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी तर हे गाणं रात्री लूपवर ऐकलं असे त्यांनी सांगितलं आहे. हे गाणं योहानीने गायलं आहे. योहानी कोण आहे? असा प्रश्न सगळ्या नेटकऱ्यांना पडला आहे. आज आपण योहानी कोण आहे हे जाणून घेणार आहोत.
-
T 3998 - क्या किया .. क्या हो गया 🤣🤣 !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
But truly an ode to that incredible Sri Lankan song ‘Manike Mage Hithe’ ..edited here to my KALIA song by the genius NAVYA NAVELI..BUT honestly Manike.. playing in loop whole night .. impossible to stop listening.. SUUUPPEEERRRBBB 🎶🎶🎶🎶 pic.twitter.com/va0kEUHHVq
">T 3998 - क्या किया .. क्या हो गया 🤣🤣 !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 15, 2021
But truly an ode to that incredible Sri Lankan song ‘Manike Mage Hithe’ ..edited here to my KALIA song by the genius NAVYA NAVELI..BUT honestly Manike.. playing in loop whole night .. impossible to stop listening.. SUUUPPEEERRRBBB 🎶🎶🎶🎶 pic.twitter.com/va0kEUHHVqT 3998 - क्या किया .. क्या हो गया 🤣🤣 !
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 15, 2021
But truly an ode to that incredible Sri Lankan song ‘Manike Mage Hithe’ ..edited here to my KALIA song by the genius NAVYA NAVELI..BUT honestly Manike.. playing in loop whole night .. impossible to stop listening.. SUUUPPEEERRRBBB 🎶🎶🎶🎶 pic.twitter.com/va0kEUHHVq
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या गायिकेला पाहून नेटकऱ्यांना वाटते की योहानी ही दाक्षिणात्य गायिका आहे. मात्र, ही गायिका भारतीय नसून श्रीलंकेची आहे. तिचं सोशल मीडियावर जे गाणं व्हायरल झालं आहे. ते गाणं तामिळ किंवा मल्याळम भाषेत नाही तर सिंहला भाषेत आहे. योहानीचे भारतात लाखो चाहते आहेत. यात बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांचा देखील समावेश आहे. हे गाणं शेअर करत अमिताभ यांनी तिची स्तुती केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी हे गाणं रात्रभर लूपवर ऐकल्याचे त्यांनी सांगितले आहे.
योहानीचे पूर्ण नाव योहानी दिलोका डिसिल्वा असे आहे. तिचा जन्म श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे 30 जुले 1993 रोजी झाला. तिने 2016 मध्ये यूट्यूबर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिचे गाणे व रॅप लोकांना पसंत येऊ लागले. आता योहानीला श्रीलंकेत 'रॅप प्रिंसेस' पुरस्काराने गौरवले आहे.
शाळेत असताना योहानी एक प्रोफेशनल स्विमर व वॉटर पोलो प्लेअर होती. त्यानंतर योहानी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. योहानीने लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट एँड प्रोफेशनल अकाउंटिंग या विषयात पदवी घेतली आहे. मात्र तिने संगीत क्षेत्रात आपले करिअर करण्याचा निर्णय घेतला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
जे गाणे श्रीलंकेबरोबर भारतातही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ते गाणं याच वर्षी मे महिन्यात प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला ३ महिन्यात ७ कोटींपेक्षा जास्त लोकांनी तिच्या गाण्याचा हा व्हिडिओ पाहिला आहे. हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतात असलेल्या तिच्या चाहत्यांनी तिच्याकडे मागणी केली की या गाण्याचे तामिळ आणि मल्याळम व्हर्जन आम्हाला पाहायचे आहे. त्यानंतर २६ जुलैला तिने या गाण्याचे तामिळ आणि मल्याळम व्हर्जन प्रदर्शित केले. हे गाणेही तिच्या चाहत्यांना खूप पसंत येत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">